सांस्कृतिक मंत्रालय

“22 ऑक्टोबर 1947” च्या आठवणी या विषयावरील राष्ट्रीय परिसंवाद व प्रदर्शनाचे राष्ट्रीय कला इतिहास, संवर्धन आणि संग्रहालय विज्ञान संस्थेच्या वतीने श्रीनगरमध्ये आयोजन


22 आणि 23 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय परिसंवाद

22 ऑक्टोबर 2020 पासून प्रदर्शन सुरू होणार

Posted On: 21 OCT 2020 2:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2020

शत्रू आमच्यापासून फक्त 50 यार्डवर आहेत. आमच्यापेक्षा ते संख्येने खूप अधिक आहेत. आमच्यावर सतत जीवघेणा मारा होत आहे. जोपर्यंत माझा शेवटचा सैनिक जिवंत असेल आणि दारुगोळा संपत नाही तोपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही.

- मेजर सोमनाथ शर्मा (परमवीर चक्र)

22 ऑक्टोबर 1947 च्या आठवणी या विषयावरील राष्ट्रीय परिसंवाद व प्रदर्शनाचे राष्ट्रीय कला इतिहास, संवर्धन आणि संग्रहालय विज्ञान संस्थेच्या वतीने श्रीनगरमधील एसकेआयसीसी येथे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी करण्यात आले असून प्रदर्शन 22 ऑक्टोबर रोजी सुरू होईल. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मुख्य सचिव, जम्मू आणि काश्मीर, बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यन आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी, डीएमसीएस आणि कुलगुरू, एनएमआय राघवेंद्र सिंग देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

22 ऑक्टोबर 1947 च्या आठवणी या प्रदर्शनात त्या दिवसाचा घटनाक्रम ग्राफिक्स आणि व्हिडीओच्या माध्यमातून सादर केला जाईल तसेच 22 ऑक्टोबर 1947 चे आक्रमण आणि त्यानंतरची कृती यातील प्रमुख क्षणांचे कथावर्णन देखील यावेळी सादर होईल. लाहोर करार, अमृतसर करार, काश्मीरची आर्थिक कोंडी, 1947- विलिनीकरणाच्या दिशेने, पाकिस्तान पुरस्कृत घुसखोर, पाकिस्तानी घुसखोर नेते, मुझफ्फराबाद, बारामुल्लाची लूटमार, चर्चवरील हल्ला, बारामुल्लाचा नायक मकबूल शेरवानी, विलिनीकरणाचा करार, महत्त्वाच्या तारखा, गिलगिटची खेळी, जनतेचे सैन्य आदींवरील चित्र फलकांचाही समावेश करण्यात आला आहे.

22 ऑक्टोबर 1947 च्या आठवणी या विषयावरील राष्ट्रीय परिसंवाद आणि प्रदर्शन, ऐतिहासिक संकल्पनेवरील भविष्यातील संग्रहालय यासंदर्भात रूपरेषा आखेल.

 

U.Ujgare /S.Tupe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1666368) Visitor Counter : 118