ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये किमान हमीभावानुसार खरेदी व्यवहार सुरु

प्रविष्टि तिथि: 19 OCT 2020 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2020


केंद्र सरकार, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या खरीप हंगामात देखील किमान हमीभावानुसार खरेदी करत आहे. वर्ष 2020-21 च्या खरीप हंगामानुसार पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, चंदीगढ, जम्मू काश्मीर  आणि केरळ या राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात किमान हमीभावानुसार 18 ऑक्टोबरपर्यंत 90.03 लाख मेट्रिक टन धानाची खरेदी 7.82 लाख शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

त्याशिवाय, 18 ऑक्टोबर पर्यंत, सरकारने आपल्या नोडल संस्थाच्या मदतीने तामिळनाडू, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांकडून 5.48 कोटी रुपये किंमतीच्या मूग आणि उडदाची खरेदी 735 शेतकऱ्यांकडून केली आहे.

खोबरा आणि उडीदाच्या खरेदीबाबत सांगायचे झाल्यास, या पिकांचे उत्पादन होणाऱ्या बहुतांश राज्यात, सध्या बाजारभाव किमान हमीभावापेक्षा अधिक आहे. खरीप हंगामातील डाळी आणि तेलबियांच्या खरेदीबाबत संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेश, निश्चित केलेल्या तारखेपासून खरेदी करण्याची तयारी करत आहेत.

            

राज्यांकडून आलेल्या प्रस्तावानुसार, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये खरिपातील 42.46 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची, समर्थन मूल्यानुसार खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

देशातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या उत्तरेकडील राज्यात 18 ऑक्टोबर 2020 पर्यंत कापसाची खरेदी हमीभावानुसार,165369 गासड्या कापसाची खरेदी करण्यात आली आहे, गेल्यावर्षी याच कालावधीत केवळ 1245 गासड्या कापसाची खरेदी करण्यात आली होती.

* * *

S.Thakur/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1665929) आगंतुक पटल : 156
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Tamil , Telugu