संरक्षण मंत्रालय

मलबार 2020 नौदल कवायती

Posted On: 19 OCT 2020 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑक्‍टोबर 2020


भारतीय नौदल-यूएस नौदल यादरम्यान द्विपक्षीय सराव म्हणून 1992 मध्ये नौदल कवायतींची मलबार मालिका सुरू झाली. 2015 मध्ये जपानचे नौदल या कवायतींमध्ये सामील झाले. या वार्षिक कवायती 2018 मध्ये फिलीपीन समुद्राच्या गुआमच्या किनाऱ्यावर, 2019 मध्ये जपानच्या किनारपट्टीवर पार पडल्या. त्यानंतर यावर्षाअखेरीस बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये या कवायतींचे आयोजन करण्यात येणार आहे. 

भारत, सागरी सुरक्षा क्षेत्रात इतर देशांशी सहकार्य वाढविण्याच्या प्रयत्नात आहे आणि ऑस्ट्रेलियाबरोबर वाढलेल्या संरक्षण सहकार्याच्या पार्श्वभूमीवर, मलबार 2020 मध्ये ऑस्ट्रेलियन नौदलाचा सहभाग दिसेल.

यावर्षी या कवायतींचे नियोजन 'नॉन-कॉन्टॅक्ट - अँट सी’ या स्वरूपात केले गेले आहे. या कवायतींमुळे सहभागी देशांच्या नौदलांमधील समन्वय बळकट होईल.

मलबार कवायती 2020 मधील सहभागी देश सागरी क्षेत्रामधील सुरक्षा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ते एकत्रितपणे मुक्त आणि सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिकला समर्थन देत असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्यास वचनबद्ध आहेत.

 

* * *

S.Thakur/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1665916) Visitor Counter : 297