नागरी उड्डाण मंत्रालय

एनसीआरटीसीला ड्रोनच्या वापरासाठी परवानगी

Posted On: 16 OCT 2020 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2020

 

नागरी हवाई  वाहतूक मंत्रालय आणि नागरी हवाई  वाहतूक महासंचालनालयाने एनसीआरटीसी, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र वाहतूक महामंडळाला रीमोटली पायलटेड एअरक्राफ्ट सिस्टीम, आरपीएएस तैनात करण्यासाठी सशर्त सूट दिली आहे. दिल्ली- मेरठ रिजनल रेपिड ट्रान्झीट सिस्टम, आरआरटीएस  साठी वेब आधारित जीआयएस मंचाच्या मॅपिंग आणि अंमलबजावणीसाठी डाटा प्राप्त करण्यासाठी ही यंत्रणा उपयोगात आणली जाणार आहे. 

या परवानगीमुळे एनसीआरटीसीला प्रभावी हवाई देखरेख आणि प्रकल्प आखणीसाठी मदत होणार असल्याचे नागरी हवाई वाहतूक  मंत्रालयाचे सह सचिव अंबर दुबे यांनी म्हटले आहे. 

31 डिसेंबर 2020 किंवा डिजिटल स्काय  प्लॅटफॉर्म पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत यापैकी जे आधी होईल तोपर्यंत ही सशर्त सूट लागू राहील. 

यासाठीच्या अटी आणि निर्बंध याप्रमाणे आहेत- 

  • सीएआर विभाग 3 शृंखला X भाग I, च्या संबंधित तरतुदीतून एनसीआरटीसीला दिलेली ही सूट हवाई वाहतूक मंत्रालयाच्या विमान नियमावली 1937 च्या नियम 15 ए मधल्या सवलतीच्या अधीन आहे. 
  • एनसीआरटीसी, नवी दिल्ली स्थानिक प्रशासन, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, भारतीय विमान प्राधिकरण यांच्याकडून आरपीएएस कार्यान्वयन सुरु करण्यापूर्वी आवश्यक परवानग्या घेईल. 
  • एनसीआरटीसी, जारी करण्यात आलेल्या  वैध ड्रोन स्वीकृती क्रमांकासह (म्हणजेच D1DAOOU2U साठी SPIDEX-600) केवळ  केंद्र सरकारला माहिती दिलेली आरपीएएस सुरु करेल.
  • डीजीसीए च्या उड्डाण मानक महासंचालनालयाला मानक संचालन पद्धतीची प्रत दिल्यानंतर आणि कार्याची व्याप्ती एनसीआरटीसी सादर करेल.त्यानंतरच आरपीएएस सुरु करता येईल.  
  • हवाई छायाचित्रणासाठी आवश्यक परवानगी एनसीआरटीसी घेईल.
  • आरपीएएस चे काम सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच  मर्यादित राहील. 
  • आरपीएएस सुयोग्य स्थिती असल्याची खातरजमा   एनसीआरटीसी करेल. 
  • साधनाशी संपर्क झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा  पोहोचल्यास एनसीआरटीसी, नवी दिल्ली त्यासाठीच्या वैद्यकीय- कायदे विषयक  बाबींसाठी जबाबदार राहील. 
  • अपघाताने   तिसऱ्याच पक्षाला नुकसान पोहोचल्यास एनसीआरटीसी कडे त्यासाठी पुरेसे विमा कवच राहील.
  • आरपीएचा वापर करताना कोणतेही घातक साहित्य वाहून नेले जात नाही याची खातरजमा एनसीआरटीसी करेल.
  • सार्वजनिक मालमत्ता आणि लोक यांची  सुरक्षितता आणि गोपनीयता एनसीआरटीसी सुनिश्चित करेल. यासंदर्भात काही घटना घडल्यास डीजीसीए जबाबदार राहणार नाही. 
  • सीएआर विभाग 3 शृंखला X भाग I, च्या परिच्छेद 13.1 मध्ये नमूद  केलेल्या उड्डाण प्रतिबंधित क्षेत्रात एनसीआरटीसी, सबंधित मंत्रालयाच्या परवानगीविना आरपीएएस चा उपयोग करणार नाही. 
  • सीएआर च्या तरतुदीनुसार विमानतळा नजीकच्या भागात आरपीएएस काम करू शकणार नाही. या क्षेत्रात काम करायचे असल्यास भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून पूर्व परवानगी आवश्यक राहील. 
  • केवळ प्रशिक्षित आणि अनुभवी व्यक्तीच आरपीएएस हाताळेल याची  सुनिश्चिती एनसीआरटीसी करेल.

सार्वजनिक नोटीससाठी लिंक 

 

* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1665293) Visitor Counter : 152