रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

नितीन गडकरी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशातील 16 राष्ट्रीय महामार्गांचे उद्घाटन आणि पायाभरणी सोहळा

Posted On: 16 OCT 2020 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2020

 

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील 1411 किलोमीटर लांबीच्या आणि 15,592 कोटी रुपये खर्चाच्या 16 राष्ट्रीय महामार्गांचे उद्घाटन आणि पायाभरणी सोहळा पार पडला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ व्ही.के.सिंग आणि जी किशन रेड्डी आणि इतर मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती.

YouTube: https://youtu.be/AdDhgRnuz9s

याप्रसंगी बोलताना, गडकरी म्हणाले आंध्र प्रदेशातील रस्ते महामार्गांची लांबी मे 2014 पूर्वी 4193 किमी होती, ती आता 6860 किमी एवढी झाली आहे. अशाप्रकारे गेल्या 6 वर्षांत राष्ट्रीय महामार्गात 2667 किमी (64%) वाढ झाली आहे. 34,100 कोटी रुपयांचे काम डिपीआर पातळीवर आहे आणि 2024 पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, तर 25,440 कोटी रुपयांचे काम अंमलबजावणी पातळीवर सुरु आहे.

ते म्हणाले, प्रकल्पांमध्ये 50-60% प्रगती, ज्याचा खर्च 18,100 कोटी आहे, एवढी साध्य झाली आहे. गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना प्रलंबित मुद्दे निकाली काढण्यासाठी लवकरात लवकरत दिल्लीला भेट देण्याचे निमंत्रण दिले. राज्यासाठी जास्तीत जास्त विकास प्रकल्प मंजूर करण्यासाठी पूर्ण सहकार्याचे आश्वासन त्यांनी दिले.

राज्यात 5000 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम भारतमाला परियोजनेअंतर्गत करण्यात येत आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. याव्यतिरिक्त, भारतमाला परियोजनेअंतर्गत 400 किलोमीटर बंदरजोडणी रस्त्यांचा विकास करण्यात येईल. गडकरी म्हणाले, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुलभ करणे ही भारतमाला परियोजनेची संकल्पना आहे. देशभरात 35,000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे काम भारतमाला परियोजनेअंतर्गत सुरु आहे.

 

मंत्री म्हणाले, पंतप्रधानांच्या न्यू इंडिया संकल्पनेशी सुसंसगत अशी जागतिक दर्जाची वाहतूक पायाभूत सुविधा ही प्राथमिकता आहे, यासाठी भारतमाला परियोजनेसारखे उपक्रम राबवण्यात येत आहे, हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे, दिल्ली- अमृतसर कटरा एक्सप्रेसवे, चेन्नई-बेंगळुरु एक्सप्रेसवे, अनंतपूर-अमरावती एक्सप्रेसवे भारतमाला परियोजनेअंतर्गत विकसित करण्यात येत आहेत.

गडकरी यांनी सांगितले की, 2020-21 मध्ये 8306 कोटी रुपये खर्चाचे 637 किलोमीटरचे प्रकल्प पूर्ण होतील. यात 150 किमी लांबीचे, 3850 कोटी रुपयांचे प्रकल्प एनएचएआयचे आहेत, तर 487 किमी लांबीचे, 4456 कोटी रुपयांचे प्रकल्प रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे आहेत. याशिवाय, 535 किमी लांबीचे, 11,712 कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प चालू आर्थिक वर्षात देण्यात येतील. यात 217 किमी लांबीचे, 9071 कोटी खर्चाचे 4 प्रकल्प एनएचएआयचे आहेत आणि 318 किमी लांबीचे 9 प्रकल्प, ज्यांचा खर्च 2641 कोटी रुपये आहेत, ते रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे आहेत. आणखी 2371 किमीचे प्रकल्प, ज्यांचा खर्च 34,133 कोटी रुपये आहे ते डिपीआर पातळीवर आहेत. यात एनएचएआयचे 19559 कोटी रुपये खर्चाचे, 713 किमी लांबीचे 10 प्रकल्प आहेत, आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे 24 पीसी प्रकल्प 404 किमी लांबीचे, 7004 कोटी रुपये खर्च आणि 7570 कोटी रुपये खर्चाचे 20 प्रकल्प 1254 किमी लांबीचे आहेत.   

   

Click here for PDF on Project Details in Andhra Pradesh

* * *

S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1665128) Visitor Counter : 158