संरक्षण मंत्रालय

सशस्त्र सेनादल ध्वजदिन निधीसाठी योगदान देण्याचे नागरिकांना आवाहन

Posted On: 15 OCT 2020 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020

संरक्षण मंत्रालयाचा  माजी सैनिक कल्याण विभाग युध्दात  बळी पडलेल्या सैनिकांच्या विधवा, हौतात्म्य पावलेल्या सैनिकांचे पाल्य,माजी सैनिक तसेच अपंगत्व आलेले माजी सैनिक (ESM)  यांच्या कल्याणासाठी आणि पुनर्वसनासाठी  दारिद्रय निवारण देणगी, शैक्षणिक  देणगी,दफनविधी देणगी , वैद्यकीय निधी,अनाथ आणि दिव्यांग मुले देणगी  अशा त्यांच्या व्यक्तिगत गरजांसाठी  आर्थिक सहाय्य करतो.हे आर्थिक सहाय्य  सशस्त्र दल ध्वजदिन निधीतून   दरवर्षी 7 डिसेंबरला साजरा होत असलेल्या सशस्त्र सेनादल ध्वजदिनी (AFFDF) देण्यात येते ,ज्यात सामान्य नागरीक योगदान देतात.

युध्दात  बळी पडलेल्या सैनिकांच्या विधवा ,हौतात्म्य पावलेल्या सैनिकांचे पाल्य,माजी सैनिक तसेच अपंगत्व आलेले माजी सैनिक (ESM)  यांच्याशी जोडून घेत आणि आपल्या सैनिकांसोबत दृढ ऐक्य दर्शवित त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तिंसाठी  सशस्त्र सैन्य दल ध्वज दिन निधीसाठी सढळपणे योगदान देण्याचे आवाहन देशातील सर्व नागरिकांना करण्यात येत आहे. 1961सालच्या आयकर कायद्याच्या  कलम 80 G (5)(vi) अंतर्गत  सशस्त्र सैन्यदलाला दिलेल्या  देणगीला सूट दिली जाते.

ही रक्कम, पंजाब नँशनल बँक ,आर.के पुरम ,नवीदिल्ली येथील शाखेत  केंद्रीय सैनिक मंडळ सचिवालय ,नवीदिल्ली यांच्या नावे(Kendriya Sainik Board Secretariat, New Delhi by A/c Payee ) चेक अथवा डीडी काढून किंवा  ‘Armed Forces Flag Day Fund A/c’ , Saving Bank A/c No.3083000100179875(IFSC Code-PUNB0308300)या खात्यात  थेट जमा  करावी किंवा नलाईन www.ksb.gov.in.येथे जमा करावी.

 

B.Gokhale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1664840) Visitor Counter : 164