नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

भारत आणि फ्रान्सची आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या तिसऱ्या परिषदेसाठी अध्यक्ष आणि सह-अध्यक्ष म्हणून फेरनिवड

Posted On: 14 OCT 2020 9:05PM by PIB Mumbai

 

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या तिसऱ्या संमेलनासाठी 34 आयएसए सभासद मंत्र्यांची उपस्थिती होती. संमेलनात 53 सभासद देश आणि 5 स्वाक्षरी करणारे आणि संभाव्य सदस्य देशांचा सहभाग होता.

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अध्यक्ष आणि सह-अध्यक्ष म्हणून भारत आणि फ्रान्स यांची दोन वर्षाच्या कालावधीसाठी 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या तिसऱ्या आभासी बैठकीत फेरनिवड झाली.

शाश्वत हवामान कृती आघाडीच्या माध्यमातून खासगी आणि सार्वजनिक कॉर्पोरेट क्षेत्रातील आयएसएच्या सहभागीतेसाठी आयएसए सचिवालयाच्या पुढाकारांना संमेलनात मान्यता दिली. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील दहा संस्थांनी संमेलनाला प्रत्येकी 1 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढा धनादेश सुपूर्द केला.

अध्यक्षपदावरुन बोलताना ऊर्जा, नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी हवामानबदला विरोधात सर्व सदस्य देशांनी एकत्र येऊन काम करण्याच्या निर्णयाची प्रशंसा केली. तिसऱ्या संमलेनात उष्णता आणि थंडी यासंदर्भातील सातव्या उपक्रमावर चर्चेस सुरुवात केल्याचे त्यांनी स्वागत केले. गेल्या पाच वर्षांत सौर ऊर्जेत वाढ झाली असून आता जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा ऊर्जा स्रोत आहे, असे सिंग म्हणाले. जागतिक ऊर्जेच्या 2.8% वाटा सौर ऊर्जेचा आहे आणि हे असेच सुरु राहिले तर 2030 पर्यंत जगाच्या मोठ्या भागात सौर ऊर्जा ऊर्जेचा सर्वात महत्त्वाचा स्रोत ठरेल. 

आयएसएच्या आराखड्याच्या सहमतीनंतर प्रथमच, या क्षेत्रात कार्य करणारे देश आणि संस्थांसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. आशिया पॅसिफिक क्षेत्रात जपानला आणि युरोप क्षेत्रात नेदरलँडला सर्वाधिक सौर ऊर्जा विस्तार केल्याबद्दल विश्वेश्वरैया पुरस्कार प्रदान करण्यात आला. 12,330 अमेरिकी डॉलर्स एवढ्या रक्कमेचा हा पुरस्कार आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री एम एल खट्टर यांनी कल्पना चावला यांच्या नावे पुरस्कार जाहीर केला. हा पुरस्कार सौर ऊर्जा क्षेत्रात कार्य करणाऱ्या आयआयटी दिल्लीचे डॉ भीम सिंग आणि दुबई वीज आणि जल प्राधीकरणाचे डॉ आयशा अल्नुयमी यांना प्रदान करण्यात आला.

आयएसएने दिलेला दिवाकर पुरस्कार, भारतीय रेल्वे व वाणिज्य व उद्योग मंत्री, पीयुष गोयल यांनी पेन्सिल्व्हानिया विद्यापीठातून प्राप्त केलेल्या 25,000 डॉलर्सच्या योगदानापैकी अपर्णा संस्था (हरियाणा) आणि आरुषि सोसायटी यांना प्रदान केला.

आयएसएचे पहिले संमेलन 2 ते 5 ऑक्टोबर 2018 दरम्यान, ग्रेटर नोएडा येथे पार पडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अन्तोनिओ गुत्तरेस यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले होते. दुसरेकफपाप संमेलन 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2019 दरम्यान नवी दिल्ली येथे पार पडले होते. या संमेलनात 78 देशांचा सहभाग होता. तिसरे संमेलन सध्या 14 ते 16 ऑक्टोबर 2020 दरम्यान आभासी पद्धतीने होत आहे.     

***

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1664553) Visitor Counter : 235