आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

दुर्बल घटकातल्या थॅलेसेमियाच्या रूग्णांसाठी ‘‘थॅलेसेमिया बाल सेवा योजने’च्या दुस-या टप्प्याला डॉ. हर्षवर्धन यांनी केला प्रारंभ


अप्लास्टिक अॅनेमियाच्या रूग्णांसाठी मदतकार्याचा विस्तार,  200 रूग्णांना संरक्षण देणार

पंतप्रधानांच्या ‘आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा’ योजनेतील लाभार्थींच्या माहितीचे दस्तऐवजीकरण म्हणजे समाजातल्या दुर्बलांचा आर्थिक भार कमी केल्याबद्दल आलेले ‘कृतज्ञतेचे अश्रू’ - डॉ. हर्ष वर्धन

Posted On: 14 OCT 2020 8:27PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज दुर्बल घटकातल्या थॅलेसेमियाच्या रूग्णांसाठी ‘‘थॅलेसेमिया बाल सेवा योजनेच्या दुस-या टप्प्याला प्रारंभ केला. निर्माण भवनामध्ये एका आभासी कार्यक्रमामध्ये या योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

सन 2017 मध्ये कोल इंडिया वित्तपोषित सामाजिक दायित्व उपक्रमाअंतर्गत एचएससीटी म्हणजेच हेमाटोपोएटिक स्टेम सेल ट्रान्सप्लांटेशन कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. याचा उद्देश थॅलेसेमिया म्हणजेच रक्तअल्पता आणि सिकल सेल या आजारासारखा असलेल्या रूग्णांच्या कुटुंबाला दत्तक घेवून त्यांच्यातील पेशीसमानता शोधून सुदृढ पेशींचे प्रत्यारोपण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला यामुळे एकाच उपचारामध्ये बरे करण्यासाठी आवश्यक गोष्टी करण्यात आल्या.  या उपचारासाठी आर्थिक मदत 10लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असून आता या मदतीचा विस्तारही करण्यात आला आहे. यामुळे या वैद्यकीय मदतीचा लाभ 200 रूग्णांना होवू शकणार आहे.

या उपक्रमामध्ये सहभागी होवून मोफत प्रत्यारोपण करणा-या सर्व वैद्यकीय तज्ज्ञांचे डॉ. हर्षवर्धन यांनी अभिनंदन केले. यासाठी लखनौच्या एसजीपीजीआय रूग्णालय, चंदिगडचे पीजीआय, दिल्लीचे एम्स, वेल्लोरचे सीएमसी, कोलकाताचे टाटा वैद्यकीय केंद्र आणि नवी दिल्लीची राजीव गांधी कर्करोग उपचार संस्था या संस्थामधल्या वैद्यकीय तज्ञांनी सहकार्य करून एकूण 135 मुलांमध्ये पेशींचे मोफत प्रत्यारोपण यशस्वी केले, याबद्दल या सर्वांचे डॉ. हर्षवर्धन यांनी अभिनंदन केले. रक्तअल्पता हा आजार प्रामुख्याने आदिवासी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे 40 टक्के असल्याचे दिसून आले आहे. एचबीईसारखे हिमोग्लोबिनचे प्रमाण 3.50 टक्क्यांपर्यंतही असू शकते, त्यामुळे या आजाराकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. लुधियानाच्या सीएमसी आणि बंगलुरूच्या नारायण हृदयालय या रुग्णालयांमध्येही आता 2020 पासून या आजारावर उत्तम उपचार केले जात असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी नमूद केले.

कोल इंडिया आणि त्यांच्या सामाजिक दायित्व पार पाडणा-या समूहाचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले. रक्त अल्पता सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या समाजातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या रुग्णांना मदत केल्यामुळे त्यांची या आजारातून मुक्तता झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू केली आहे, असे सांगून डॉ. हर्षवर्धन म्हणाले, आम्ही या योजनेतल्या लाभार्थींचे दस्तऐवजीकरण करताना अनेकांना भेटलो, त्यावेळी त्यांच्या वैद्यकीय खर्चाचा मोठा भार सरकारने उचलल्यामुळे त्यांना अगदी कृतज्ञतेचे अश्रू अनावर होत होते, असा अनुभव घेतला आहे.

यावर्षी  अप्लास्टिक अॅनेमियाच्या म्हणजेच रक्तअल्पता असलेल्या रूग्णांसाठी मदतकार्याचा विस्तार, करण्यात येणार असून  200 रूग्णांना संरक्षण देणार आहे. आयुष्यमान भारत - हेल्थ अँड वेलनेस सेंटर्सचा वापर करून समुपदेशनाच्या माध्यमातून अशा आजाराला रोखणे शक्य होणार आहे. आम्ही प्रत्येक जिल्हा रूग्णालयामध्ये रक्त संक्रमण सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसचे काही  जिल्ह्यातल्या आरोग्य उप- केंद्रांवरही ही सुविधा आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, एएस अँड एमडी वंदना गुरनानी, कोल इंडियाचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक प्रमोद अग्रवाल, आणि आरोग्य मंत्रालय तसेच कोल इंडियाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

वैद्यकीय व्यवसायातील सीएमसी वेल्लोरचे  डॉ. विक्रम मॅथ्यूज, लखनौच्या एसजीपीजीआयच्या डॉ. सोनिया नित्यानंद, डॉ. दिनेश बर्रानी, चंदिगडचे डॉ. पंकज मल्होत्रा, नवी दिल्ली एम्सचे डॉ. मनोरंजन महापात्रा, कोलकाता टाटा वैद्यकीय केंद्राचे डॉ.मॅमेन चंडी, बंगलुरूच्या नारायण हृदयालयाचे डॉ. सुनील भट्ट, लुधियाना सीएमसीचे डॉ. जोसेफ जॉन तसेच थॅलेसेमियाचे रूग्ण मुले, त्यांचे पालक आदि या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.

****

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1664535) Visitor Counter : 269