रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

गडकरी यांच्या हस्ते  उद्या झोझिला भुयाराच्या पहिल्या  14.15 कि.मी.च्या सुरूंगस्फोटाच्या कामाचा प्रारंभ होणार


या भुयारामुळे राष्ट्रीय महामार्ग -1ला जोडणाऱ्या  मार्गाने  श्रीनगर खोरे आणि लेह यांना सर्वप्रकारच्या हवामानात  जवळच्या झेड-एमओआरएच  भुयारी मार्गाने आणि हिमकडा कोसळण्यापासून वाचविणाऱ्या बांधकामापासून जोडले जाणार

Posted On: 14 OCT 2020 5:55PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि  सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग मंत्री श्री.नितीन गडकरी उद्या जम्मू आणि काश्मीरमधील झोझिला भुयाराच्या सुरूंगस्फोट कामाला प्रारंभ करणार आहेत.या भुयारामुळे श्रीनगर खोरे आणि लेह (लडाख पठार) सर्व प्रकारच्या हवामानात जोडले जातील आणि त्यामुळे जम्मू आणि काश्मीर भागांत(सध्या जम्मू आणि काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश) आर्थिक आणि सामाजिक एकरुपता वृध्दिंगत होईल. या कामात 14.15किलोमीटर लांबीचा आणि सुमारे 3000मीटर उंचीवर  असलेल्या झोझिला खिंडीला (सध्या केवळ सहा महिने मोटारमार्गे जाता येते )द्रास आणि कारगिल मार्गे श्रीनगर आणि लेह यांना राष्ट्रीय महामार्ग -1 ला जोडण्याच्या कामाचा समावेश आहे.हा पल्ला वाहन चालविण्यास जगातील सर्वात घातक असा पल्ला असून  युध्दकौशल्याच्या भौगोलिक  दृष्टीकोनातून संवेदनशील आहे.

 

हा प्रकल्प 2015 साली प्रथम योजिला होता आणि त्याचा सर्वंकष प्रकल्प अहवाल (Detailed Project Report) सीमा रस्ता संघटनेद्वारे (BRO) बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर  (BOT (Annuity mode) 2013 साली तयार करण्यात आला. या प्रकल्पाचे काम चार वेळा अयशस्वी झाले. अखेर हा प्रकल्प जुलै 2016 मधे नँशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काँरपोरेशन  (NHIDCL) यांच्याकडे अभियांत्रिकी संपादन आणि बांधकाम (EPC) तत्वावर सोपविण्यात आला. हे काम मेसर्स ITNL (IL&FS) यांना देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा लेह येथे  कोनशीला समारंभ झाला आणि  दिनांक 19-5-2018 पासून काम सुरू झाले. जुलै 2019पर्यंत काम सुरू होते परंतु त्यानंतर मेसर्स IL &FS कंपनी आर्थिक संकटात सापडली आणि प्रकल्पाचे  काम थांबले. त्यामुळे दिनांक 15-01-2019 रोजी कंत्राट रद्द केले गेले.

त्यानंतर फेब्रुवारी 2019 मधे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी या कामाचा तपशीलवार आढावा घेतला. किंमत कमी करण्यासाठी आणि रखडलेल्या प्रकल्पाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाचे उपमहाव्यवस्थापक आणि एस.एस. (विकास ,संशोधन) श्री.आय .के.पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली एक्सपर्ट ग्रुप यांच्याकडे सुपूर्द केला. या एक्सपर्ट ग्रुपने या प्रकल्पाची मांडणी आणि अंमलबजावणी  जलदगतीने आणि वाजवी किंमतीत होण्यासाठी उपाययोजना सुचविल्या.

 

या प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

i. झोझिला भुयारामुळे श्रीनगर, द्रास,कारगिल आणि लेह हे भाग सर्व प्रकारच्या हवामानात जोडले जातील. युध्दकौशल्याच्या दृष्टीने हा भाग सर्व प्रकारच्या हवामानात जोडलेला असणे, अत्यंत महत्त्वाचे आहे.

ii. झोझिला भुयाराच्या बांधकामामुळे हा भाग आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने एकरूप होईल, जो हिवाळ्यात होणाऱ्या भरपूर हिमवृष्टीमुळे देशाच्या इतर भागापासून सहा महिने तुटला जातो.

iii. झोझिला भुयार हा एकच मार्ग रस्त्याने वर्षभर जाण्यासारखा आहे. हा भुयारी मार्ग  पूर्ण झाल्यावर  ती आधुनिक भारताच्या इतिहासातील एक  अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी ठरेल.लडाख,गिलगीट ,बाल्टिस्तान यांच्या आपल्या  सीमाभागात होणाऱ्या सैन्यदलाच्या मोठ्या कारवाया लक्षात घेता देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने देखील हा अतिशय महत्त्वाचा ठरेल.

iv. झोझिला भुयार हे कारगिल, द्रास आणि लडाख या भागातील लोकांच्या 30 वर्षांपासूनच्या मागणीची फलप्राप्ती ठरेल.

v. या प्रकल्पामुळे हिमकडे कोसळण्यापासून सुटका होऊन  श्रीनगर-कारगिल- लेह या राष्ट्रीय महामार्गावरून जाणे सोपे होईल.

vi.  या प्रकल्पामुळे झोझीला भुयार पार करणे प्रवाशांना सोपे होईल  आणि प्रवासी मार्गात  3 तास ते 15 मिनिटे इतकी वेळेची बचत होईल.

vii. या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल.

***

B.Gokhale/S.Patgaonkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1664411) Visitor Counter : 170