राष्ट्रपती कार्यालय
स्वित्झर्लंड, माल्टा आणि बोट्सवाना येथील राजदूतांनी व्हिडीयो कॉन्फरन्स द्वारे अधिकारपत्रे केली सादर
प्रविष्टि तिथि:
14 OCT 2020 5:40PM by PIB Mumbai
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (ऑक्टोबर 14, 2020) एका आभासी सोहोळ्यात स्वित्झर्लंड, माल्टा आणि बोट्सवाना येथील राजदूत/ उच्चायुक्त यांच्याकडून त्यांची अधिकारपत्रे स्वाकारली. ज्यांनी अधिकारपत्रे सादर केली त्यांचा तपशील :
1. H.E. राल्फ हेकनर, स्वित्झर्लंडचे राजदूत
2. H.E. रुबेन गोसी, माल्टाचे उच्चायुक्त
3 H.E. गिल्बर्ट शिमेन मंगोल, बोट्सवानाचे उच्चायुक्त
याप्रसंगी रामनाथ कोविंद यांनी या सर्व राजदूतांना त्यांच्या नेमणूकीबद्दल शुभेच्छा दिल्या. या तीनही देशांसोबत भारताचे सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण संबध आहेत, शांतता आणि समृद्धी या सामायिक पायावर हे संबध दृढ आहेत असे राष्ट्रपतींनी नमूद केले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमधील कायमस्वरूपी नसलेल्या जागेसाठी 2021-22 या मुदतीत भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल या तीनही देशांच्या सरकारांचे त्यांनी आभार मानले.
कोविड-19 महामारीच्या कालखंडात सर्वांचे आरोग्य आणि आर्थिक उन्नती यासाठी जागतिक पातळीवरील सहकार्याची आवश्यकता आहे असे राष्ट्रपती कोविंद यांनी नमूद केले. या महामारीवर आंतरराष्ट्रीय समुदाय लवकरच उपाय शोधून काढेल आणि या संकटातून अधिक मजबूत आणि जास्त लवचिक होउन बाहेर पडेल अशी आशाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
****
B.Gokhale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1664405)
आगंतुक पटल : 225