ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसीकडून फ्लाय ॲशची संपूर्ण देशभर वाहतूक
Posted On:
14 OCT 2020 4:17PM by PIB Mumbai
ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘एनटीपीसी’ या देशातल्या सर्वात मोठ्या वीज उत्पादक संस्थेने ऊर्जा निर्मिती करताना उपयोगात येणा-या साधनांचा वापर 100 टक्के केला जावा, यासाठी प्रयत्न केला जात आहे. वीज निर्मितीतून राहिलेल्या सामुग्रीतून उप-उत्पादनांच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणजे, वीज उत्पादन करताना निर्माण होणा-या राखेचा (फ्लाय ॲश) वापर करण्यात येत आहे. यासाठी देशातल्या सिमेंट उत्पादकांचे सहकार्य घेण्यात येत आहे. पर्यावरणस्नेही आणि परवडणारे साधन म्हणून फ्लाय ॲशची वाहतूक रेल्वेच्या माध्यमातून करणात येत आहे. भारतीय रेल्वेचे देशभर असलेले जाळे यासाठी उपयोगी ठरत आहे.
उत्तर प्रदेशातल्या रिहंद येथे एनटीसीपीचा राज्यातला पहिला ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. या प्रकल्पामध्ये उर्वरित राख काही विशिष्ट अटींवर सिमेंट कारखान्यांना पाठविण्यात आल्याची माहिती एनटीपीसीने एका निवदेनाव्दारे दिली आहे. या प्रकल्पाच्यावतीने अलिकडेच 3,834 मेट्रिक टन फ्लाय ॲश रेल्वेच्या मालवाहू वाघिणीतून दालमिया येथे आसाममधल्या नागाव इथल्या भारत सिमेंट कारखान्याला पाठवली आहे. यापूर्वी अशाच प्रकारची राख उत्तर प्रदेशातल्या टिकारिया, मध्य प्रदेशातल्या किमोर, पंजाबातल्या रोपोर इथल्या एसीसी प्रकल्पांना पाठविण्यात आली
2019-20 या आर्थिक वर्षामध्ये विविध उत्पादने तयार करण्यासाठी जवळपास 44.33 दशलक्ष टन फ्लाय ॲशचा एनटीपीसीकडून पुनर्वापर करण्यात आला. एनटीपीसीमध्ये ऊर्जा निर्मिती होत असताना वर्षभरामध्ये अंदाजे 65 दशलक्ष टन राख तयार होते. त्यापैकी 80 टक्के (अंदाजे 52 दशलक्ष मेट्रिक टन) ही फ्लाय ॲश असते. एकूण राखेपैकी 73 टक्के सिमेंट उत्पादनांसाठी वापरली जाते; फ्लाय अॅशच्या विटा तयार करतात, रस्त्याच्याकडेने तटबंदीसारखे बांधकाम करणे, खाणींचे खड्डे बुजविणे, खोलगट भागातल्या रस्त्याची उंची वाढविणे अशा विविध कामासाठी या राखेचा वापर केला जातो.
एनटीपीसी समूहामध्ये एकूण 70 वीज उत्पादन केंद्रे आहेत. संस्थेची स्थापना क्षमता 62.9 जीडब्ल्यू आहे. यामध्ये 24 कोळसा, 7 गॅस आणि लिक्विड असे संयुक्त इंधनावर चालणारे, एक हायड्रो, 13 नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प असून 25 सहाय्यक आणि जेव्ही विद्युत केंद्रे आहेत. एनटीपीसी सध्या नव्याने 20 जीडब्ल्यू क्षमतेच्या प्रकल्पांची उभारणी करीत आहे. यामध्ये 5 जीडब्ल्यू नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे.
M.Chopade/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664348)
Visitor Counter : 261