भूविज्ञान मंत्रालय

तेलंगणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी (दररोज 20 सेमी पेक्षा अधिक); कर्नाटकचा किनारी आणि अंतर्गत भाग, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Posted On: 13 OCT 2020 12:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2020

भारतीय हवामान विभागाच्या वादळाची सूचना देणाऱ्या विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार:- बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात निर्माण झालेला अति कमी दाबाचा पट्टा गेल्या काही काळात  पश्चिम, आणि वायव्येकडे  ताशी 17 किलोमीटर वेगाने सरकला असून आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमाराला हा पट्टा 16.9°N अक्षांश आणि 82.5°E रेखांशांच्या दरम्यान, म्हणजेच विशाखापट्टणमपासून 25 किलोमीटर्सवर, दक्षिण- नैऋत्येकडे पोचला आहे. हा पट्टा, आंध्रप्रदेशातील काकिनाडा  आणि नरसापूरच्या जवळ आहे.

यामुळे निर्माण होणाऱ्या हवामानाच्या स्थितीचा अंदाज आणि तीव्रता पुढील प्रमाणे आहे.

इशारा:

i. पावसाचा इशारा

  • 13 ऑक्टोबर 2020: बहुतांश ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल तर तेलंगणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी (दररोज 20 सेमी पेक्षा अधिक); कर्नाटकचा किनारी आणि अंतर्गत भाग, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर आंध्र प्रदेशात रायलसीमा, दक्षिण कर्नाटकाच्या आतला भाग, दक्षिण ओडिशा,दक्षिण छत्तिसगढ आणि विदर्भात देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
  • 14 ऑक्टोबर 2020: बहुतांश ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी (दररोज 20 सेमी पेक्षा अधिक); तसेच कोकण आणि गोवा, उत्तर कर्नाटकचा आतील भाग आणि मराठवाडा भागात मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस, आणि कर्नाटकचा किनारी प्रदेश तसेच दक्षिण कर्नाटकचा आतला भाग येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

(ii) वादळी वाऱ्यांचा इशारा

  • 13 ऑक्टोबर2020:  येत्या तीन तासांत, बंगालच्या उपसागरात पश्चिम मध्य भागात आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ताशी 55-65किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून पुढे त्यांचा वेग ताशी 75 किमीपर्यंत वाढू शकतो.  मात्र त्यानंतरच्या सहा तासांत या वाऱ्याचा वेग कमी होण्याचा अंदाज असून तो ताशी 45-55किमी पर्यंत कमी होऊ शकेल. त्यापुढच्या सहा तासात, हा वेग ताशी 65किमी पर्यंत वाढेल, आणि दक्षिण ओडिशा, तामिळनाडू तसेच पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर, तसेच आजूबाजूच्या परिसरात या वादळी वाऱ्यांचा प्रभाव जाणवेल त्यानंतर हा वेग कमी होण्याची शक्यता आहे. 

आपापल्या इच्छित स्थळी हवामानाचा अचूक अंदाज बघण्यासाठी मौसम ॲप’ तसेच, कृषीविषयक हवामानाच्या माहितीसाठी मेघदूत ॲप आणि वीजविषयक इशारा समजून घेण्यासाठी ‘दामिनी ॲप’ डाऊनलोड करा. 

U.Ujgare/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1663945) Visitor Counter : 132