ऊर्जा मंत्रालय
मुंबईत सोमवारी दुपारी वीजपुरवठा खंडित होण्यामागची कारणे अभ्यासण्यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नेतृत्वात केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देऊन अशा आपत्तींवरच्या उपायांबाबत महाराष्ट्र सरकारला मार्गदर्शन करणार
राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित, राज्याच्या ग्रीडमध्ये बिघाड
वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी केंद्रीय उर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मदत : आर.के.सिंग
प्रविष्टि तिथि:
12 OCT 2020 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2020
मुंबईमधील आज खंडित झालेला वीजपुरवठा मोठ्या प्रमाणात पूर्ववत करण्यात आला आहे, 2000 मेगावॉट पेक्षा जास्त पुरवठा खंडित झाला होता त्यापैकी सुमारे 1900 मेगावॉटचा पुरवठा आता सुरु झाला आहे, उर्वरित पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत केला जाईल अशी माहिती केंद्रीय उर्जा आणि नवीन तसेच नवीकरणीय उर्जा मंत्री (स्वतंत्र प्रभार) आर.के.सिंग यांनी सोमवारी दुपारी दिली. राष्ट्रीय ग्रीड सुरक्षित असून राज्याच्या ग्रीडच्या काही भागांमध्ये बिघाड झाला होता असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नेतृत्वात केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक मुंबईला भेट देणार असून अशा प्रकारच्या आपत्तींचे कारण शोधून काढून त्यावर शक्य असलेल्या सर्व उपायांबाबत हे पथक राज्य सरकारला मार्गदर्शन करणार आहे असेही ते म्हणाले.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1663783)
आगंतुक पटल : 150