रेल्वे मंत्रालय

रेल्वेचे वाहन लोडिंगच्या माध्यमातून 2021-22 अखेरपर्यंत 20% आणि 2023-24 पर्यंत 30% मोबदला प्राप्त करण्याचे लक्ष्य


केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची वाहन निर्मिती उद्योजकांशी झालेल्या भेटीनंतर रेल्वेतून ऑटोमोबाईल लोडिंगला चालना

Posted On: 10 OCT 2020 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2020

 

रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री पीयुष गोयल यांनी आज वाहननिर्मिती उद्योजकांची रेल्वेच्या माध्यमातून वाहन वाहतुकीला चालना देण्यासाठी भेट घेतली.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स, टाटा मोटर्स, ह्युंदाई मोटर्स, फोडर् मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, होंडा इंडिया, मारुती सुझूकी लिमिटेड, ऑटोमोबाईल फ्रेट ट्रेन ऑपरेटर्स, ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन प्रतिनिधींनी बैठकीत भाग घेतला. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि रेल्वेतून मोटारगाड्यांची वाहतूक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेबरोबर भागीदारीत काम करण्याची कटीबद्धता व्यक्त केली.

भारतीय रेल्वे वाहन वाहतुकीत नवीन उंची गाठत आहे. 2013-14 मध्ये वाहन वाहतूक केवळ 429 रेक्स एवढी होती, ती वाढून 2019-20 मध्ये 1,595 रेक्स एवढी झाली. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात (एप्रिल ते सप्टेंबर) महिन्यात भारतीय रेल्वेने 836 रेक्स वाहन वाहतूक केली आहे, जी गेल्यावर्षी 731 रेक्स एवढी होती.

रेल्वेचे वाहन वाहतुकीच्या माध्यमातून 2021-22 अखेरपर्यंत 20% आणि 2023-24 पर्यंत 30% मोबदला साध्य करण्याचे ध्येय आहे.

आजच्या बैठकीतील सहभागितांना रेल्वेने मोटारवाहतूक वाढविण्यासंदर्भात घेतलेल्या उपायंची माहिती दिली, ज्यामुळे वाहन वाहतुकीत भरीव वाढ दिसून येईल- आणि रेल्वेतून अधिक वाहन वाहतूक करावी, असे सांगितले. 

ऑटोमोबाईल लोडिंग सुलभ करण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजना:

a) मे 2013 पासून बीसीएसीबीएम रेक्सच्या वाहतूक खर्चात वाढ केली नाही

b) एनएमजीसाठीच्या मालवाहतुकीत मे 2018 पासून बदल केला नाही

c) एनएमजी रेक्समध्ये वाढ – 30 (1 एप्रिल रोजी) ते 42

d) एनएमजी रेक्सना दोन स्थानक लोडिंगची परवानगी

e) ऑटोमोबाईल निर्यात परवानगी:

i)एनएमजी रेक्सच्या माध्यमातून बांग्लादेशसाठी वाहतूक

ii)नेपाळसाठी नौतनवा टर्मिनल मार्गे वाहतूक (एनई रेल्वे)

f) ऑटोमोबाईल लोडिंगसाठी 7 नवीन टर्मिनलची सुरुवात

चितपूर (ईआर); पेनुकोंडा (एसडब्ल्युआर); नसराला (एनआर); नौतनवा (एनईआर) – नेपाळसाठी वाहतूक; सालछपरा, फुरकेटींग, & न्यू तीनसुकीया (सर्व एनएफआर)

j) नवीन सुमारे 52 रेल्वे टर्मिनल्स उपलब्ध

k) खासगी पीएफटी आणि आयसीडीना वाहन वाहतूक हाताळण्याची परवानगी.

 

B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1663447) Visitor Counter : 102