वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पियुष गोयल यांनी दिल्लीच्या प्रगती मैदानातील बांधकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला , या ठिकाणी पुनर्विकास सुरु असून जागतिक दर्जाचे आयईसीसी बांधले जात आहे
Posted On:
10 OCT 2020 4:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2020
केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज दिल्लीतील प्रगती मैदानातील बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला , ज्याचा पुनर्विकास केला जात असून जागतिक दर्जाचे एकात्मिक प्रदर्शन-कम -परिषद केंद्र (आयईसीसी) उभारले जात आहे. गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री एच.एस.पुरी, पंतप्रधानांचे प्रधान सल्लागार पी. के. सिन्हा, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अधिकारी, आयटीपीओ, एनबीसीसी आणि इतर सहभागी संस्थानी या व्हर्चुअल बैठकीत भाग घेतला.
बांधकाम कार्याच्या सद्यस्थितीबाबत सादरीकरण आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर महत्वपूर्ण कामे नियंत्रणात असल्यामुळे गोयल यांनी प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. यापूर्वी लॉकडाऊन आणि त्यानंतर कामगारांचे स्थलांतर यामुळे बांधकामावर परिणाम झाला होता, जूनमध्ये या कामाला गती मिळाली आणि ती अजून कायम आहे. सुमारे 4800 कामगार सध्या त्या ठिकाणी विविध कामांमध्ये व्यस्त आहेत. मार्च 2021 पर्यंत बहुतांश इमारतींचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. लवकरच टप्प्याटप्प्याने या इमारतींचे हस्तांतरण सुरू होण्याची शक्यता आहे आणि ऑक्टोबर 2021 पर्यंत पूर्ण प्रकल्प सोपवण्यात येणार आहे. या ठिकाणी 6 बोगदे असतील आणि परिसरात सुरळीत वाहतुकीसाठी एक मुख्य बोगदा असेल. वातानुकूलन यंत्रणा कोविड -19 प्रतिबंध नियमानुसार असेल, विजेची पुरेशी उपलब्धता असेल, इमारती गळती रोधक असतील आणि पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा साठा होणार नाही याची काळजी घेईल. आत्मनिर्भर अभियानाचा एक भाग म्हणून, प्रकल्पात आयात केलेल्या घटकांचा वापर सातत्याने कमी केला जात असून सध्या तो प्रकल्प खर्चाच्या केवळ 9.55% इतका आहे.
प्रगती मैदानाचा जागतिक परिषदा आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी आधुनिक आणि अद्ययावत केंद्र म्हणून पुनर्विकास केला जात आहे ज्यात 7,000 व्यक्तींची आसन क्षमता आहे. 2022 मध्ये भारत जी -20 शिखर परिषदेचे आयोजन करण्याची शक्यता असून हे आयईसीसी त्यासाठी मुख्य ठिकाण असेल.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663370)
Visitor Counter : 128