रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
परदेश प्रवास करताना आंतरराष्ट्रीय वाहनचालक परवान्याच्या नूतनीकरण सुविधेसाठी जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत
प्रविष्टि तिथि:
10 OCT 2020 3:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2020
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, दिनांक 7 ऑक्टोबर 2020 रोजी जीएसआर 624 (ई) मसुदा अधिसूचना जारी केली असून ज्यांच्या आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिटचा (आयडीपी) कालावधी ते परदेशात असताना संपला आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट (आयडीपी) देण्यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी मते आणि सूचना मागवल्या आहेत.
जे नागरिक परदेशात प्रवास करत आहेत किंवा अन्य देशात आहेत आणि आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट कालबाह्य झाले असून परदेशात नूतनीकरणाची कोणतीही यंत्रणा नसल्याचे आढळून आले आहे . अशा नागरिकांच्या सोयीसाठी सीएमव्हीआर 1989 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. हे नागरिक, भारतीय दूतावास/मिशन ऍब्रॉड पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात आणि हे अर्ज संबंधित आरटीओद्वारे विचारात घेण्यासाठी व्हीएएचएएन कडे जातात.
तसेच या प्रस्तावामध्ये आयडीपीसाठी अर्ज करताना वैद्यकीय प्रमाणपत्र आणि वैध व्हिसा या अटी रद्द करण्याचा देखील समावेश आहे कारण ज्या नागरिकांकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना आहे त्यांना अन्य वैद्यकीय प्रमाणपत्रांची आवश्यकता असू नये. तसेच असेही काही देश आहेत ज्यात व्हिसा ऑन अरायवल आहे आणि अशा प्रकरणात प्रवासापूर्वी भारतात आयडीपीसाठी अर्ज करताना व्हिसा उपलब्ध नसतो.
अधिसूचना जारी झाल्यापासून 30 दिवसांच्या आत सहसचिव (एमव्हीएल, आयटी आणि टोल), ईमेल: jspb-morth[at]gov[dot]in, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली -110001 यांना मते/ सूचना पाठवता येतील.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1663364)
आगंतुक पटल : 212
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam