रेल्वे मंत्रालय

कोविड-19 विरोधातील लोकचळवळीत (जनआंदोलन) भारतीय रेल्वेचा व्यापक सहभाग


पीयुष गोयल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिली कोविड प्रतिज्ञा

Posted On: 09 OCT 2020 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2020


भारतीय रेल्वेने कोविड-19 विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केलेल्या लोकचळवळीत व्यापक सहभाग घेतला आहे. या जनचळवळीचा शुभारंभ झाल्यानंतर रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोविड प्रतिज्ञा दिली. 

या देशव्यापी जन चळवळीत सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी पुढे येऊन सहभागी व्हावे, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव म्हणाले. कोविड प्रोटोकॉलविषयी जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांना आस्थापना/स्थानकाजवळील जनतेला यात सहभागी करुन घेण्यास सांगितले. संक्रमणाचा पराभव करण्यासाठी सर्व रेल्वे कर्मचार्‍यांना काय करावे आणि काय टाळावे याची माहिती आणि शिक्षण दिले पाहिजे यावरही त्यांनी भर दिला. रेल्वे स्थानके आणि रेल्वेमध्ये जागृतीसाठी बॅनर/पोस्टर्स लावण्याविषयी सांगण्यात आले. समाजमाध्यमांतूनही कोविडविषयी माहितीचे प्रसारण करण्यात येणार आहे.  

जन आंदोलनाच्या पहिल्या दिवशी  5,41,087 रेल्वे कर्मचाऱ्यांनी कोविड प्रतिज्ञा घेतली. 2452 रेल्वे स्थानके, 273 रेल्वे आणि 847 रेल्वे कार्यालयांवर  बॅनर/पोस्टर्स लावण्यात आले. कोविड-19 विरोधात जनजागृती करण्यासाठी एक ऑडिओ जिंगल सार्वजनिक घोषणा प्रणालीद्वारे 2060 रेल्वे स्थानके, 95 रेल्वे आणि 138 रेल्वे आस्थापनांमध्ये वाजवण्यात आली.

 

* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1663234) Visitor Counter : 126