दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय टपाल खात्याकडून 9 ते 15 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
Posted On:
09 OCT 2020 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2020
भारतीय टपाल खात्याकडून दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिनानिमित्त राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय पातळीवर टपाल खात्याच्या कामाविषयी जनतेमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने जागतिक टपाल दिन आणि राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन केले जाते.
यावर्षी टपाल खात्याकडून राबवण्यात येणारे उपक्रम पुढीलप्रमाणे:-
दिनांक
|
तपशील
|
9 ऑक्टोबर
|
जागतिक टपाल दिन
|
10 ऑक्टोबर
|
बँकींग दिन
|
12 ऑक्टोबर
|
पीएलआय दिन
|
13 ऑक्टोबर
|
फिलाटेली दिन
|
14 ऑक्टोबर
|
व्यवसाय विकास दिन
|
15 ऑक्टोबर
|
मेल्स डे
|
यानिमित्त विभागीय पातळीवर सर्व टपाल कार्यालयांची स्वच्छता, जुने नामफलक, कालबाह्य नोटीसा काढणे, जुन्या नोंदी काढून टाकणे अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. टपालतिकीट संग्राहकांसाठी आभासी कॅम्पस/कार्यशाळा आयोजित करणे, बचत खाते उघडणे, आयपीपीबी खाते उघडणे, आधार जोडणी करणे आणि पीएलआय आरपीएलआय प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.
सर्कल प्रमुख प्रीमियम ग्राहकांना पत्र लिहून व्यवसाय दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतील. पीओपीएसके, आधार नोंदणी आणि अद्ययावत सुविधा, सीएससी, गंगाजल उपलब्धता या सुविधांविषयी ज्येष्ठ नागरिकांमध्ये जागृती करणे हे उपक्रमही राबवण्यात येणार आहेत.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1663213)
Visitor Counter : 151