सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
थावरचंद गेहलोत यांनी केले ,“मानसिक आरोग्य:कोविड 19च्या पल्याड दृष्टीकोन” यावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आभासी उद्धाटन
Posted On:
08 OCT 2020 8:34PM by PIB Mumbai
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी “मानसिक आरोग्य:कोविड 19च्या पल्याड दृष्टीकोन” यावरील व्हर्चुअल आंतरराष्ट्रीय परिषदेचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे आज उद्घाटन केले. ऑस्ट्रेलिया-भारत इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रोफेसर क्रेग जेफ्री हे परिषदेचे सहअध्यक्ष होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना थावरचंद गहलोत यांनी जगभरातच मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे याकडे लक्ष वेधले. भारत सरकारने मध्य प्रदेशातील सीहोर येथे स्थापन केलेली ‘मानसिक आरोग्यासाठीची राष्ट्रीय संस्था’ तसेच मानसिक आरोग्यासंबंधी सुरू केलेली ‘किरण मानसिक आरोग्य पुनर्वसन हेल्पलाइन’ याच्या उभारणीसाठी भारत सरकारने घेतलेल्या पुढाकाराचा अभिमानाने उल्लेख केला.
DEPwD सचिव शकुंतला डी गॅमलिन यांनी परिषदेचा आढावा घेतांना मानसिक आरोग्यासंबंधीच्या तक्रारी वाढत आहेत त्यामुळे त्याविषयी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे याकडे लक्ष वेधले. covid-19 महामारी मुळे मानसिक सामाजिक आरोग्यावर मोठा दुष्परिणाम झाल्याचे नमूद करून त्यांनी यामुळे जगभरातच आजारपणाचे ओझे वाढत जाणार असल्याचे सांगितले. DEPwD सहसचिव प्रबोध सेठ यांनी परिषदेचे संचालन केले.
देशातील मानसिक आरोग्य संदर्भात जागरुकता वाढण्यात ‘मानसिक आरोग्य पुनर्वसन राष्ट्रीय संस्था’ या संस्थेची महत्वाची भूमिका असल्याची बाब त्यांनी यावेळी विशद केली.
परिषदेत पाच तांत्रिक सत्र असून भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तज्ञांनी, आरोग्यसेवक नसलेल्या फ्रंटलाईन कार्यकर्त्यांचे तणाव व्यवस्थापन, घरातून काम करताना मानसिक आरोग्याची जपणूक, आत्महत्या आणि त्यासंबंधित भारतातील माध्यमांचे वार्तांकन, भारत तसेच ऑस्ट्रेलियातील मानसिक आरोग्य आणि मानवाधिकार, दिव्यांग व्यक्तीचे मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी सूत्रे, नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे बालक विकास आणि शिक्षण या बाबत असलेला दृष्टीकोण या बाबींसंबंधी विचार मांडले.
ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बॅरी ओफॅरेल यांनी ऑस्ट्रेलियातील मानसिक आरोग्यविषयक परिस्थितीचा आढावा घेतला. मानसिक आजार असलेल्यांच्या पुनर्वसन या क्षेत्रातील संशोधन आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे यासाठी दोन्ही सरकारांनी संबंधित संस्थांच्या माध्यमातून संयुक्तरित्या पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन केले.
परिषदेतील इतर मान्यवर व्याख्यात्यांमध्ये माजी गृहसचिव आणि मणिपूर तसेच मिझोरामचे माजी राज्यपाल वि. के. दुग्गल, भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या सचिव अनिता करवल, मेलबर्न विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे उपकुलगुरू मायकल वेस्ली, मेंटल हेल्थ फाउंडेशन, ऑस्ट्रेलिया या संस्थेचे अध्यक्ष वासन श्रीनिवासन, NHRCचे भारतातील माजी सचिव जयदीप गोविंद, भारत सरकार च्या DARPGचे अतिरिक्त सचिव व्ही. श्रीनिवास, मेलबर्न विद्यापीठाचे ग्रेग आर्मस्ट्रॉंग, एम्सचे प्रोफेसर राजेश सागर, IHBAS संचालक निमेश देसाई, NIMHANSच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख प्रतिमा मूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे एडवोकेट एस. के. रुंगठा, मेलबर्न विद्यापीठाचे डॉ. के मथियास, NIEPVD डेहराडूनचे अध्यक्ष डॉ हिमांशू दास, मेलबर्न विद्यापीठाचे सह प्राध्यापक नाथन ग्रील्स हे सर्व उपस्थित होते.
डिपार्टमेंट ऑफ एम्पॉवरमेंट ऑफ परसन्स विद डिसॅबिलिटीज(DEPwD), M/o सामाजिक न्याय आणि सक्षमता आणि मेलबर्न विद्यापीठाच्या सहयोगाने या परिषदेचे आयोजन केले होते. ऑस्ट्रेलिया सरकार आणि भारत सरकार यांच्यामध्ये 2018 साली अपंगत्वासंबधीत क्षेत्रातील सहकार्याबद्दल झालेल्या सामंजस्य करारानुसार सह-कार्यक्रमाचा हा एक भाग होता.
*****
B.Gokhale/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1662872)
Visitor Counter : 243