कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
डीओपीटीने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जम्मू आणि काश्मीर, लडाख, ईशान्य प्रदेश आणि अंदमान-निकोबार बेटांना भेट देण्यासाठी एलटीसी सुविधेत सवलत प्रदान केली
प्रवास शिथिलतेला 25 सप्टेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ- डॉ जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
08 OCT 2020 8:18PM by PIB Mumbai
कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डिओपीटी) शासकीय कर्मचाऱ्यांना जम्मू आणि काश्मीर, लडाख, ईशान्येकडील प्रदेश आणि अंदमान आणि निकोबार बेटांना भेट देण्यासाठी प्रवास सुविधेत (एलटीसी) सवलत दिली आहे. ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन, अणु ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले की ही सवलत 25 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, पात्र शासकीय कर्मचारी होमटाऊन एलटीसी ऐवजी जम्मू आणि काश्मीर, ईशान्य प्रदेश, लडाख आणि अंदमान-निकोबार बेटांसाठी एलटीसी सुविधा घेऊ शकतील.
याव्यतिरिक्त, पात्र-नसलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जम्मू-काश्मीर, ईशान्य प्रदेश, लडाख, अंदमान-निकोबार बेटांना भेट देण्यासाठी हवाई प्रवास सुविधा उपलब्ध आहे. ही प्रक्रिया आणखी सुलभ होण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना खासगी विमानाने प्रवास करण्याची सुविधा दिली आहे, जी पूर्वी फक्त एअर इंडियाच्या विमान प्रवासासाठी होती.

सरकारी कर्मचार्यांसाठी ही एक मोठी आणि खास सुविधा असल्याचे सांगताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, सर्व पात्र सरकारी कर्मचारी एलटीसीचा जम्मू-काश्मीर किंवा ईशान्येकडील प्रदेश किंवा यापैकी कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी चार वर्षांच्या ब्लॉकमध्ये त्यांच्या होम टाऊन एलटीसीच्या ऐवजी वापर करु शकतात. मात्र, होमटाऊन आणि कामाचे ठिकाण एकाच जागी असलेल्यांना ही सुविधा मिळणार नाही. तथापी, या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत हवाई प्रवासाच्या इकॉनॉमी वर्गाने एलटीसी-80 अंतर्गत सुविधा देण्यात आली आहे.
2014 पासून सरकारने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली दूरस्थ क्षेत्रांत सुशासन आणि जीवनमान उंचावण्यासाठी प्राधान्य दिले आहे.
<><><><><>
B.Gokhale/ S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1662859)
आगंतुक पटल : 220