संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एअरो इंडिया 2021 संदर्भातील राजदूतांची आभासी परिषद संपन्न
आशियातील सर्वात मोठ्या एअरोशोसाठी जगाला निमंत्रण
Posted On:
07 OCT 2020 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2020
संरक्षण मंत्रालयांतर्गत, असलेल्या संरक्षण उत्पादन विभागाने एअरो इंडिया-2021 संदर्भातील राजदूतांची आभासी परिषद संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. परिषदेसाठी राजदूत, उच्चायुक्त प्रमुख आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित 75 देशातील 200 पेक्षा अधिक निमंत्रितांचा समावेश होता. 13 वा द्वैवार्षिक एअरो शो बेंगळुरु येथे 3-7 फेब्रुवारी, 2021 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात एकाच छताखाली भारताच्या हवाई क्षेत्रातील आणि संरक्षण उत्पादनातील क्षमतांचे प्रदर्शन करण्यात येईल, याविषयी परदेशी दुतावासांच्या अधिकाऱ्यांना एअरो इंडिया-21 ची तपशीलवार माहिती देण्यात आली.
परिषदेला संबोधित करताना संरक्षणमंत्री म्हणाले, एअरो इंडिया-21 भारताच्या संरक्षण आणि हवाई क्षेत्रात पहिल्या पाच देशांमध्ये समावेश होण्याच्या दूरदृष्टीशी सुसंसगत आहे. राजनाथ सिंग म्हणाले, आत्मनिर्भर भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि यासाठी संरक्षण मंत्रालयाने संरक्षण क्षेत्रात 74% थेट परकीय गुंतवणुकीला मंजूरी, संरक्षण खरेदी प्रक्रिया- 2020, आणि व्यवसाय-सुलभतेसाठी सह-उत्पादन तसेच संरक्षण उत्पादन आणि निर्यात चालना धोरण 2020 (डीपीईपीपी 2020) चा मसुदा तयार केला आहे.
राजनाथ सिंग पुढे म्हणाले, भारताचे एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्र परिपक्व झाले आहे आणि भारतातील उत्पादन उद्योग आणि परदेशात निर्यात करण्यासाठी भारतात उत्पादित संरक्षण उपकरणे स्थापन करण्यासाठी मित्र देशांशी परस्पर लाभदायक भागीदारी शोधत आहे. एअरो इंडिया-21 मधून भारताची 25 अब्ज अमेरिकी डॉलर्स उलाढालीचे उद्दिष्ट साध्य करण्याविषयी सरकारचा हेतू दिसून येईल, ज्यात 2025 पर्यंत 5 अब्ज अमेरिकी डॉलर्स एअरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन आणि सेवा निर्यातीचे उद्दिष्ट आहे.
जागतिक प्रतिनिधींना एअरो इंडिया-21 हा व्यवसायभिमुख कार्यक्रम असेल आणि कोविड- 19 नियमांचे पूर्ण पालन करेल, अशी माहिती देण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने 11 सप्टेंबर 2020 रोजी कार्यक्रमाचे संकेतस्थळ सुरू केल्यापासून या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि एअरो शोसाठी 90% पेक्षा अधिक जागा आरक्षित झाली आहे. आशियातील सर्वात मोठ्या एअरोशदरम्यान विविध व्यावसायिक कार्यक्रम आणि सेमिनारचे नियोजन आहे आणि 500 पेक्षा अधिक प्रदर्शकांच्या उपस्थितीची शक्यता आहे.
राजनाथ सिंग यांनी एअरो इंडिया- 2021 चा अधिकृत उद्घाटन चित्रफितीचे यावेळी प्रकाशन केले. "अब्जावधी संधीचा मार्ग" ही यावर्षीच्या एअरो स्पेसची संकल्पना आहे. संरक्षण मंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की एअरो इंडिया -21 कोविडनंतरच्या जागतिक परिस्थितीत भारताची पुढाकार घेण्याची क्षमता दर्शवेल.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा, संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण उत्पादन सचिव राज कुमार यांनीही परिषदेला संबोधित केले. सर्वांनीच आत्मनिर्भर भारताचा एक आधारस्तंभ म्हणून संरक्षण मंत्रालयाला चालना देण्याचा संकल्प मांडला आणि परदेशी प्रतिनिधींना एअरो इंडिया-21 साठी आमंत्रित केले.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1662458)