गृह मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून कारकिर्दीला 20 वे वर्ष सुरू झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचे केले अभिनंदन 


जर कोणी 130 कोटी भारतीयांच्या आकांक्षा खरोखरच समजू शकत असेल तर ते आहेत नरेंद्र मोदी 

Posted On: 07 OCT 2020 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑक्‍टोबर 2020

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, लोकप्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 20 वे वर्ष सुरू झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी ट्विट केले की, "7 ऑक्टोबर हा देशाच्या इतिहासातील एक महत्वाचा दिवस आहे. 2001 मध्ये या दिवशी, नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्या दिवसापासून, विश्रांती न घेता देशाच्या हिताच्या उद्देशाने आणि जनसेवेसाठी वाहिलेला प्रवास अविरत सुरू आहे".

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचार, दृष्टी आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाने प्रेरित प्रत्येक भारतीय आज भारताला पुन्हा विश्व गुरू म्हणून स्थापित करण्यासाठी आगेकूच करत आहे. त्यांच्या अलौकिक नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कल्याणासाठी काम करणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, असे अमित शहा म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, जर कोणी 130 कोटी भारतीयांच्या आकांक्षा खरोखरच समजत असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. आपल्या दूरदर्शी विचारसरणीने ते बलवान, आधुनिक आणि स्वावलंबी असा भारत निर्माण करीत आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी राज्यात विकासाची क्रांती घडवून आणली आणि आता विविध ऐतिहासिक योजनांनी आणि कार्यांद्वारे कोट्यवधी गरीब, शेतकरी, महिला व समाजातील वंचित घटकांना सक्षम करुन त्यांच्या जीवनात एक सकारात्मक बदल आणत आहेत, असे शहा म्हणाले.

भुजला विनाशकारी भूकंपातून बाहेर काढणे असो, किंवा गुजरातला शांतता व सौहार्दाचे प्रतीक बनवणं असो, किंवा कठोर परिश्रम व दूरदर्शी विचारांच्या माध्यमातून देशाला विकास आणि प्रगतीचे गुजरात मॉडेल देणं असो, हे फक्त आणि हे फक्त मोदीजी यांच्या कटीबद्धतेचे फलित आहे, असे अमित शहा यांनी नमूद केले.

 

* * *

M.Chopade/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1662452) Visitor Counter : 135