रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

पुढच्या वर्षी ऑक्टोबरपासून ट्रॅक्टरसाठीचे कार्बन उत्सर्जनविषयक नियम लागू तर बांधकाम उपकरण वाहनांविषयीचे नियम एप्रिल 2021पासून लागू होणार

Posted On: 05 OCT 2020 7:24PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 30 सप्टेंबर 2020 ला जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, GSR 598(E) च्या मार्फत CMVR 1989 च्या नियमात सुधारणा करण्यात आली आहे. ज्यानुसार, ट्रॅक्टरसाठीचे (TREM स्तर-4) कार्बन उत्सर्जनविषयक नियम लागू करण्याची तारीख आता या वर्षीच्या ऑक्टोबरपासून पुढच्या वर्षी एक ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या संदर्भात, मंत्रालयाला, कृषी मंत्रालय, ट्रॅक्टर उत्पादक कंपन्या आणि कृषी संघटनांकडून विनंतीपत्रे आली होती. त्यानुसार, उत्सर्जन विषयक पुढच्या टप्प्यातील नव्या नियमांची अंमलबजावणी 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहे. ही अंमलबजावणी सहा महिन्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे.

या सुधारणेचा आणखी एक उद्देश, इतर मोटार वाहन, ज्यांना BS हा निकष आहे आणि इतर कृषीयांत्रिकी, बांधकाम उपकरणे वाहन आणि इतर तत्सम वाहनांमध्ये होणारी गफलत दूर करणे हा ही आहे. या सुधारणांमध्ये :-

(i) कृषीयांत्रिकी (कृषी ट्रॅक्टर, पॉवर टिलर्स आणि संयुक्त हार्वेस्टर) आणि बांधकाम उपकरण वाहने यांच्यासाठीचे उत्सर्जनविषयक नियम वेगळे करणे.  आणि,

(ii) भारत स्टेज (CEV/TREM)–4 पासून भारत स्टेज (CEV/TREM) –5 असे उत्सर्जनविषयक निकषाच्या परिभाषेत बदल करणे.   

a. टर्म स्टेज-4 आणि टर्म स्टेज-5 कृषी ट्रॅक्टर आणि इतर उपकरणांसाठी

b.   CEV स्टेज–4 आणि CEV स्टेज-5 बांधकाम उपकरण वाहनांसाठी .

या सुधारित नियमांचा मसुदा G.S.R 491(E), या अधिसूचनेअंतर्गत 5 ऑगस्ट 2020 रोजी प्रसिध्द करण्यात आला.

 

M.Chopade/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1661816) Visitor Counter : 143