रेल्वे मंत्रालय
केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते फूलबागान मेट्रो स्टेशनचे उद्घाटन
पूर्व-पश्चिम मेट्रो सेवेचा फूलबागान पर्यंत विस्तार
प्रविष्टि तिथि:
04 OCT 2020 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2020
केंद्रीय रेल्वे तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते, आज कोलकात्याच्या पूर्व-पश्चिम मेट्रोवरील फूलबागान मेट्रो स्टेशनचे उद्घाटन झाले. व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून, त्यांनी फूलबागान रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलतांना गोयल यांनी, कोविडच्या काळात, फूलबागान स्थानक बांधून पूर्ण करणाऱ्या सर्व चमूचे अभिनंदन केले. साल्ट लेक स्टेडियम ते फूलबागान हा 1.665 किलोमीटर लांबीचा पट्टा या भागातील प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. ही इथल्या नागरिकांना दुर्गापुजेची भेट असल्याचे सांगत, मेट्रो ते कोलकात्याच्या नागरिकांसाठी सर्वात सुरक्षित, स्वच्छ आणि जलद वाहतुकीचे साधन आहे, असे गोयल म्हणाले.
जर राज्य सरकारने जमीन उपलब्ध करुन दिली आणि या मार्गातील अतिक्रमणे हटवली तर कोणताही रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
पर्यावरण राज्यमंत्री आणि पश्चिम बंगालचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी फूलबागान सारखे आधुनिक आणि सुंदर स्थानक नियोजित वेळेआधीच बांधून पूर्ण केल्याबद्दल सर्व चमूचे उद्घाटन केले. या स्थानकामुळे सेल्दा स्थानकावरून जा ये करणे प्रवाशांना सोयीचे होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी महिला आणि बालकल्याण मंत्री, देबश्री चौधरी देखील उपस्थित होत्या.
या रेल्वेमार्गाची लांबी 16.5 किलोमीटर असून प्रकल्पासाठीचा एकूण खर्च 8574.98 कोटी रुपये इतका आहे. हा रेल्वेमार्ग, हुगळी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरील हावडा आणि पूर्व किनाऱ्यावरील साल्ट लेक शहराला जोडणार आहे.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1661656)
आगंतुक पटल : 186