इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

RAISE 2020 संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी एमआयटी, गुगल रिसर्च इंडिया, आयबीएम इंडिया आणि दक्षिण आशिया, बर्कले आणि जागतिक आर्थिक मंचाचे तज्ञ होणार सहभागी


कृत्रिम बुद्धिमत्ता, श्रमशक्तीसठी कौशल्यबांधणी, कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जबाबदार बांधणीसाठी संशोधनाची गरज या विषयांवर 7 ऑक्टोबरला समर्पित सत्र

भारत सरकारचे प्रधान विज्ञान सल्लागार प्रा. विजय राघवन यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन- प्रयोगशाळेपासून ते बाजारापर्यंत’ या विषयावर विशेष सत्र

Posted On: 03 OCT 2020 1:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन होणाऱ्या RAISE-2020 या शिखर परिषदेत, एमआयटी च्या कॉम्पुटर सायन्स विभागाच्या संचालक दैनियेला रुस, गुगल रिसर्च इंडियाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचे संचालक डॉ मिलिंद तांबे आयबीएम इंडीया चे व्यवस्थापकीय संचालक, संदीप पटेल, यु जी बर्कले चे डॉ जोनाथन रसेल आणि जागतिक आर्थिक मंचाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या प्रमुख  अरुणिमा सरकार यांच्यासारखे दिग्गज मान्यवर सहभागी होणार आहेत. इलेक्ट्रोनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग तसेच नीती आयोगाने, कृत्रिम बुद्धीमत्तेवरील ही जागतिक आभासी परिषद- RAISE 2020-म्हणजेच ‘सामाजिक सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर’ या विषयावर 5 ते 9 ऑक्टोबर या काळात आयोजित केली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातल्या जागतिक भागीदारीविषयी प्रा रस या परिषदेत आपली मते मांडतील. भारत जून 2020 मध्ये या भागीदारीत सहभागी झाला आहे.

मायक्रोसॉफ्टच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान अधिकारी डॉ रोहिणी श्रीवास्तव कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रासाठी तयार असे मनुष्यबळ तयार करण्याविषयीच्या सत्रात बोलतील. त्यांच्यासह इतरही मान्यवर वक्ते या चर्चेत भाग घेतील.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर यावरील संशोधनाबाबत डॉ मिलिंद तांबे तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकासासाठी वापर करण्यातली आव्हाने आणि संधी या विषयावर संदीप पटेल मार्गदर्शन करतील.

त्याशिवाय, ट्रायचे अध्यक्ष आर एस शर्मा आणि सेंटर फॉर डिजिटल फ्युचर चे अध्यक्ष आर चंद्रशेखर यांच्यात ‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करतांना मानवाला केंद्रस्थानी ठेवण्याची गरज’ या विषयावर परिसंवाद होईल. 

तसेच, ‘कृत्रिम बुद्धिमता संशोधन- प्रयोगशाळा ते बाजार’ या विषयावर होणाऱ्या विशेष सत्रात, भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार, प्रा विजय राघवन यांचे भाषण होईल. 

त्याशिवाय भारतातील विविध बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांचे संस्थापक आणि कृत्रिम बुद्धिमत्ताक्षेत्रातील तज्ञांची वेगवेगळ्या विषयावरील विशेष सत्रे यावेळी आयोजित केली जाणार आहेत. 

आतापर्यंत, 123 देशांतील अध्ययन, संशोधन आणि सरकारी प्रतिनिधी अशा 35,034 लोकांनी या RAISE 2020 मध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.

RAISE 2020 शिखर परिषद (http://raise2020.indiaai.gov.in/) चर्चा आणि सहमतीच्या मार्गाने माहितीचे भांडार निर्माण करणारे एक व्यासपीठ म्हणून उपयुक्त ठरू शकेल.

RAISE 2020 विषयी:

RAISE 2020 ही कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील पहिलीच जागतिक परिषद असून सामाजिक परिवर्तन, सामावेष्ण आणि सक्षमीकरण यासाठी भारताचा दृष्टीकोन आणि आराखडा तयार करण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे. भारत सरकारच्या इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग आणि नीती आयोगाने ही परिषद आयोजित केली आहे.

RAISE 2020 चे संकेतस्थळ: http://raise2020.indiaai.gov.in/

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1661263) Visitor Counter : 142