श्रम आणि रोजगार मंत्रालय
श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव म्हणून अपूर्व चंद्र यांनी कार्यभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
01 OCT 2020 4:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2020
भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) महाराष्ट्र संवर्ग 1988 च्या तुकडीतले अधिकारी अपूर्व चंद्र यांनी आज श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी संरक्षण मंत्रालयामध्ये सरंक्षण अधिग्रहण विभागाचे महा संचालक म्हणून कार्य केले आहे. संरक्षण उद्योग क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी देशांतर्गत संरक्षण विषयक सामुग्री तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासंबंधी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रासमोर असलेल्या सर्व आव्हानांना तोंड देण्याविषयक सज्जतेसाठी जरूरी असणारे कार्य अपूर्व चंद्र यांनी केले.
Y8XX.jpg)
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयामध्ये अपूर्व चंद्र यांनी सात वर्षांपेक्षा जास्त काळ कार्य केले असुन त्यांनी सन 2013 ते 2017 या काळामध्ये महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव म्हणूनही कार्य केले आहे.
भारतीय सशस्त्र दलाला लागणा-या शस्त्र सामुग्रीच्या अधिग्रहण प्रक्रिया वेगाने केली जावी आणि देशाच्या लष्कराला शस्त्रात्रांच्या बाबतीत अधिक सुदृढ बनविण्यासाठी दि. 1 डिसेंबर, 2017 रोजी संरक्षण मंत्रालयाच्या अधिग्रहण विभागाच्या महा संचालकपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने संरक्षण अधिग्रहण प्रक्रियेचे नवीन धोरण तयार केले. त्या धोरणाची 1 ऑक्टोबर 2020 पासून अंमलबजावणीही सुरू झाली. त्यामुळे सशस्त्र दलासाठी लागणा-या सामुग्रीच्या अधिग्रहणामध्ये आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना मिळाली आहे.
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1660633)
आगंतुक पटल : 163