कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे : डॉ जितेंद्र सिंग
Posted On:
29 SEP 2020 7:40PM by PIB Mumbai
नवीन कृषी कायद्यांच्या माध्यमातून आणलेल्या कायद्यानुसार कंत्राट करार पिकासाठी होईल, जमीनीसाठी नाही असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले तसेच याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मोदी सरकारने आणलेल्या शेतकरी कायद्यांच्या समर्थनार्थ आणि कॉं0ग्रेस पक्षाद्वारे पसरवण्यात येत असलेल्या चुकीच्या माहितीविरोधात आपल्या लोकसभा मतदार संघातून मोहीम सुरू करताना डॉ जितेंद्र सिंह हे कथुआ आणि उधमपूर जिल्ह्यांचा परिसर आणि सीमावर्ती खेड्यांतील कार्यकर्ते, सरपंच आणि बीडीसी अध्यक्षांना संबोधित करत होते.

डॉ. जितेंद्रसिंग म्हणाले, सामान्य शेतकरी समाधानी आहे आणि त्याला कसलीही भीती नाही, मात्र काही राजकीयदृष्ट्या प्रेरित हितसंबंध आहेत ज्यांना शेतीत कोणतेही ज्ञान किंवा हिस्सा नाही परंतु ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून त्यातून समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पुढे म्हणाले, भारतीय कृषी समुदाय आणि सामान्य लोकांच्या हिताचे आहे की, सर्व समान विचारसरणीच्या लोकांनी पुढे यावे आणि स्वार्थ साधणार्या घटकांनी सुरू केलेली ही गैरप्रचार आणि द्वेष मोहीम स्पष्टपणे हाणून पाडावी.
विधेयकात शेतकर्यांची जमिन विक्री, भाडेपट्ट्यावर किंवा तारण ठेवण्यास स्पष्टपणे बंदी असताना डॉ.जितेंद्र सिंह यांनी विचारले की, आरोप केला जात असल्याप्रमाणे काही भांडवलदारांनी घेतलेल्या शेतकर्यांच्या जमिनीचा प्रश्न येतोच कुठे? ते म्हणाले, हे विधेयक स्पष्टपणे नमूद करते की हा करार जमिनीसाठी नव्हे तर पिकांसाठी असेल.
याशिवाय, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, निश्चित भाव मिळावा यासाठी शेतकर्यांशी कंत्राट करार केला जाईल. एवढेच नव्हे तर नवीन कायद्यात शेतकर्यांना कोणत्याही वेळी कोणत्याही दंडाशिवाय करारातून माघार घेण्याची तरतूद असल्याचेही ते म्हणाले.
डॉ जितेंद्रसिंग यांनी विरोधकांनी वादविवादाचे काल्पनिक मुद्दे हाती घेतल्याचा आरोप केला , ज्यांचा कायद्यात कोणताही संदर्भ दिसत नाही. ते म्हणाले की, उदाहरणार्थ एमएसपीची तरतूद केव्हाही हटवण्यात येईल असे कुठेही नमूद केलेले नाही आणि तरीही कॉंग्रेस पक्ष आणि अन्य काहीजण निरपराध शेतकऱ्यांच्या मनात खोटी भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
डॉ जितेंद्रसिंग यांनी पक्षातील सहकाऱ्यांना आवाहन केले की प्रत्येक खेड्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्याच्याविरोधात जे मोठे कट रचले जात आहेत ते समजावून सांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या कल्याणकारी उपक्रमांचा फायदा यामुळे कृषी क्षेत्राला घेता येईल असेही त्यांनी नमूद केले.
M.Iyangar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660129)
अभ्यागत कक्ष : 172