रेल्वे मंत्रालय

संपूर्ण पुरवठा साखळीचे डीजीटायझेशन सुनिश्चित करणारे युजर डेपो मोड्यूल भारतीय रेल्वेकडून कार्यान्वित

प्रविष्टि तिथि: 28 SEP 2020 7:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 सप्टेंबर  2020

सीआरआयएस,रेल्वे माहिती प्रणाली केंद्राने विकसित केलेले  युझर डेपो मोड्यूल, पश्चिम रेल्वेच्या सर्व युझर डेपोमध्ये, (टी आणि आरएस) सदस्य पी सी शर्मा यांनी 28.09.2020 ला डिजिटली कार्यान्वित केले.

भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये ही प्रणाली लवकरच अमलात आणली जाईल. भांडार डेपो पर्यंत रेल्वेच्या पुरवठा साखळीचे आधीच डीजीटायझेशन करण्यात आले आहे मात्र वापरकर्त्याकडून यासंदर्भातले काम मानवी स्वरूपात होत होते. या प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे मानवी  कामकाज आता  डिजिटल होऊन  परिवर्तन घडणार आहे. सर्व संबंधितांमध्ये माहितीची देवाण-घेवाण ऑनलाईन होणार आहे. यामुळे संपूर्ण पुरवठा साखळीचे डीजीटायझेशन सुनिश्चित होणार आहे.

यामुळे कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढीला लागून सेवा स्तरावर सुधारणा होणार असून ग्राहक समाधानही वाढणार आहे.

 

M.Chopade/N.Chitale/ P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1659850) आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Tamil , Telugu