पर्यटन मंत्रालय

पर्यावरण मंत्रालयाकडून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन साजरा

Posted On: 27 SEP 2020 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  27 सप्टेंबर  2020

पर्यटक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि स्वच्छता यांची काळजी घेण्यासाठी आदरातिथ्य उद्योगाला मदत करण्याकरिता क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियासोबत साथी उपक्रमाची सुरुवात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आज जागतिक पर्यटन दिवस दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून साजरा केला. या कार्यक्रमाला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय पर्यटन आणि संस्कृतीमंत्री( स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद सिंग पटेल देखील यावेळी उपस्थित होते.

पर्यटन मंत्रालय सचिव योगेंद्र त्रिपाठी, पर्यटन महासंचालक मीनाक्षी शर्मा, पर्यटन संयुक्त सचिव राकेश कुमार वर्मा, अतिरिक्त पर्यटन महासंचालक रुपिंदर ब्रार आणि पर्यटन मंत्रालयाचे इतर अधिकारी या आभासी कार्यक्रमात सहभागी झाले होते. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने हे वर्ष पर्यटन आणि ग्रामीण विकास वर्ष म्हणून जाहीर केले आहे. रोजगार निर्मिती आणि संधींसाठी पर्यटनाच्या क्षमतेला प्रोत्साहन देण्याची संधी या वर्षात निर्माण झाली आहे. शहरी स्थलांतर रोखण्यासाठी आणि नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन बजावणार असलेली भूमिका अधोरेखित करण्याचे आणि समावेशकता निर्माण करण्याचे देखील ते काम करेल.

या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांनी साथी ॲपची सुरुवात केली. आदरातिथ्य उद्योगाला आपल्याकडे येणारे पर्यटक, त्यांचे आदरातिथ्य करणारा कर्मचारीवर्ग आणि इतरांची सुरक्षितता आणि स्वच्छताविषयक काळजी घेण्यासाठी आणि त्याद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियासोबत साथी हा उपक्रम सुरू केला आहे. प्रधान यांनी यावेळी अतुल्य भारत पर्यटक सुविधा प्रमाणीकरण कार्यक्रमावरील पथिक या माहितीपटाचे देखील प्रारंभिक प्रदर्शन केले.

आयसीपीबी माइसचा हा प्रमोशनल माहितीपट असून, भारताशी स्पर्धा करणाऱ्या पर्यटनस्थळांकडून अतिशय सक्रिय पद्धतीने आपल्या स्थानांची प्रसिद्धी केली जात असताना या माहितीपटाद्वारे भारतातील स्वागतपर कार्यक्रमांबाबत सकारात्मक संदेश प्रसारित करण्याचा उद्देश आहे. आनंदाचे वातावरण आणि विश्वासाचे वातावरण पुन्हा निर्माण होत आहे, जिव्हाळ्याचे आदरातिथ्य आणि सुरक्षाविषयक नियमांचे पालन आणि अतिशय आनंददायी अनुभवाची हमी हा संदेश या माहितीपटातून दिला जात आहे.

साथी प्लिकेशन आणि आयआयटीएफसीचे ऑनलाईन लर्निंग मॉड्युल सुरू केल्याबद्दल  धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रालयाची प्रशंसा केली. आपली संस्कृती, वारसा, अल्प ज्ञात स्थळे, खाद्यपदार्थ इत्यादींची माहिती देखो अपना देश या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून देण्याच्या मंत्रालयाच्या प्रयत्नांचे देखील त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी शाश्वत पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केले. यापुढील काळात पर्यटन केंद्रांवर बोटी चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेल, केरोसीन यांच्या ऐवजी सीएनजी/ पीएनजी सारख्या प्रदूषणमुक्त इंधनांचा वापर करण्याची त्यांनी सूचना केली. तसेच या ठिकाणी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करण्यावर देखील त्यांनी भर दिला. सर्वांसाठी खुल्या असलेल्या संपूर्ण भारतातून कोणत्याही ठिकाणी उपलब्ध असलेल्या अतुल्य भारत पर्यटक सुविधा प्रमाणपत्र कार्यक्रमाची सुरुवात केल्याबद्दल देखील त्यांनी पर्यटन मंत्रालयाची प्रशंसा केली.

देशभरात पर्यटकांच्या सोयीसाठी प्रशिक्षित व्यावसायिकांचे मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

M.Iyengar/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1659648) Visitor Counter : 186