अर्थ मंत्रालय
प्राप्तीकर विभागाच्या झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये शोध मोहिमा
Posted On:
26 SEP 2020 7:05PM by PIB Mumbai
प्राप्तीकर विभागाने 25 सप्टेंबर 2020 रोजी झारखंड आणि पश्चिम बंगाल येथे 20 प्रमुख उद्योग समुह आणि निवासी संकुलात शोध आणि सर्वेक्षण मोहीम हाती घेतली होती. वनस्पती तूप, रिअल इस्टेट आणि चहा व्यापाराशी हा उद्योगसमुह संबंधित आहे. या समुहाचे कोलकाता येथे रिअल इस्टेट प्रकल्प आहेत.
शोध मोहिमेदरम्यान नियमित लेख्यांव्यतिरिक्त, अनियमित रोकड खर्च आणि रोकड अग्रिम आणि रोखीने व्याज भरल्याचे आढळून आले. तसेच, ग्रूप शेल कंपन्यांमध्ये रक्कम आढळून आली जी रिअल इस्टेट कंपनीला कर्ज म्हणून दिली होती.
बहुतांश कंपन्यांच्या संचालकपदी कुटुंबातील सदस्य आहेत, वास्तव व्यवसाय आढळून आला नाही तसेच फार कमी आयकर परतावे दाखल केले आहेत. तसेच आरओसी परतावे सुद्धा सादर केले नाहीत.
एक अशीच कंपनी आहे, ज्या कंपनीचा 2014 पासून व्यवसाय नाही, मात्र 7 कोटी रुपयांची रोख विक्री दाखवण्यात आली आहे. ही रोख रक्कम कोलकाता येथील बँक खात्यांमध्ये जमा केली आहे, तर, रोकड विक्री ही झारखंड येथील खरेदीदाराकडून झाल्याची नोंद दर्शवण्यात आली आहे.
शोध मोहिमेदरम्यान हार्ड डिस्क, पेन ड्राईव्हज आणि हस्तलिखीत डायऱ्या हस्तगत केल्या. काही डायऱ्यांमध्ये रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये व्यावसायिक जागेसाठी कर्ज दिल्याची आणि कर्ज घेतल्याची नोंद आहे. कंत्राटदारांना नियमबाह्य रोख रक्कम अदा केल्याचे पुरावे आहेत आणि डमी कंत्राटदारांना बनावट व्यवहार केल्याचेही आढळून आले आहे. नोंदीत प्रकल्पखर्च कमी दाखवण्यात आला आहे, पुराव्यात हे दिसून येते की, बांधकामासाठी नियमबाह्य रक्कम खर्च केली गेली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, 40 कोटी रुपयांच्या रोकड हस्तांतरणाचे पुरावे उपलब्ध आहेत. तसेच रिअल इस्टेट प्रकल्पासाठीच्या 80 कोटी रुपयांच्या अग्रीम व्यवहारांची चौकशी सुरु आहे. पुढील तपास सुरु आहे.
****
B.Gokhale/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659392)
Visitor Counter : 162