रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

जगातील सर्वांधिक लांबीच्या अति उंचावरील शिंकुन ला बोगद्याच्या डीपीआर कामाला एनएचआयडीसीएल कडून गती


बोगद्यामुळे मनाली-कारगिल महामार्ग संपूर्ण वर्ष वाहतुकीसाठी खुला ठेवण्यास होणार मदत

Posted On: 23 SEP 2020 6:18PM by PIB Mumbai

 

रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित (एनएचआयडीसीएल) यांनी जगातील सर्वांधिक लांबीच्या हाय-अल्टिट्यूड शिंकुन ला बोगद्याच्या (१३.५ किलोमीट) सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) कामाला गती दिली आहे, याबरोबरच केंद्रशासित प्रदेश लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या लाहौलस्पिती या त्याच्याशी जोडलेल्या रस्त्यांचे काम जलदगतीने सुरू केले आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर, मनाली कारगील महामार्ग हा संपूर्ण वर्षभर वाहतुकीसाठी खुला राहील.

केंद्रशासित प्रदेश लडाख येथील सीमाभागातील परिसर आणि हिमाचल प्रदेश येथील पायाभूत सुविधांचा विकास करण्यास भारत सरकार प्राधान्य देत आहे. रस्ता जोडणी सुधारण्यात एक समग्र दृष्टिकोन ठेवण्यासाठी आणि वर्षभरात वापरण्यासाठी तो उपलब्ध व्हावा, यासाठी   एनएचआयडीसीएल चे व्यवस्थापकीय संचालक श्री के के पाठक यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने पदुम मार्गे लेह ते शिंकुन ला बोगद्याच्या उत्तर आणि दक्षिण प्रारंभस्थानाची पाहणी करण्यासाठी १२ तास प्रतिदिवस अशा पद्धतीने रस्ता मार्गे दोन दिवसांचा प्रवास केला. या पाच दिवसांच्या भेटीमध्ये लडाख प्रदेशात शिंकुन ला बोगद्याच्या उत्तर आणि दक्षिण प्रारंभस्थानाची या चमूने पाहणी केली आणि प्रकल्प अहवालाच्या सल्लागारांमार्फत सुरू असलेल्या भूगर्भ तपासणी कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

हिवाळ्यात प्रारंभी या भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते, त्यामुळे पर्यंत बोगद्याच्या प्रारंभ स्थानांच्या कामाला गती देऊन हे काम जास्तीत जास्त १५ ऑक्टोबर २०२० पूर्ण झाले पाहिजे, यावर श्री पाठक यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान भर दिला.  लडाख आणि लाहौल व स्पिती जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील संपर्क सुधारण्यासाठी एनएचआयीडीसीएलच्या प्रयत्नांचे या ठिकाणी उपस्थित स्थानिकांनी कौतुक केले.

.....

M.Chopade/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1658252) Visitor Counter : 129