अंतराळ विभाग
इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACe) अवकाश क्षेत्रात खाजगी गुंतवणूक आणि अंतरिक्ष संशोधनाला प्रोत्साहन देणार : जितेंद्र सिंग
Posted On:
22 SEP 2020 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2020
केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणुउर्जा आणि अवकाश राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात स्पष्ट केले की सरकारने अंतरिक्ष क्षेत्रात खासगी गुंतवणूक आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटरची (IN-SPACe) स्थापना केली आहे.
- IN-SPACe. पुढील प्रकारे खाजगी क्षेत्राला उत्तेजन आणि पाठिंबा देईल.
- तांत्रिक सहकार्य पुरवणे
- प्रोत्साहन निधी पुरवणेअंतरिक्ष विभागात तात्पुरत्या सुविधा उपलब्ध करून देणे.
- NSIL कडून आवश्यकतेनुसार येणाऱ्या निविदा भरण्यास परवानगी
- विज्ञान आणि अंतरिक्ष संशोधन प्रकल्पात सहकार्य
IN-SPACe ही खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने स्थापन केलेली शैक्षणिक आणि नियामक संस्था आहे. या अंतर्गत निधी व्यवस्थापन वगळण्यात आले आहे.
खाजगी गुंतवणूकदार पुढील प्रकारे सहभागी होऊ शकतात.
- उपग्रहाची बांधणी.
- उपग्रह प्रक्षेपित करणार्या वाहनाची बांधणी.
- उपग्रह प्रक्षेपण.
- ॲप्लिकेशन तयार करणे आणि अंतरिक्ष संबंधित सेवा पुरवणे.
- अंतरिक्ष क्षेत्रातील कामांसाठी सिस्टीम किंवा सब-सिस्टीम विकसित करणे.
* * *
M.Iyengar/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1657911)
अभ्यागत कक्ष : 189