विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

एसटीआयपी 2020 मध्ये विज्ञानामध्ये महिलांचा सहभाग आणि नेतृत्व यावर तज्ञांची विस्तृत चर्चा

Posted On: 22 SEP 2020 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2020


विज्ञानातील भारतीय महिलांची कमी टक्केवारी आणि विशेषत: विज्ञान क्षेत्रातील महिला नेतृत्वबाबतीतील तफावत आणि नवीन विज्ञान तंत्रज्ञान व नाविन्य धोरण एसटीआयपी 2020 मध्ये त्यांचे निराकरण  करण्याच्या पद्धती यावर अलीकडेच झालेल्या एका सत्रात विस्तृत चर्चा झाली.  टीम एसटीआयपी -2020 सह शंभरहून अधिक महिला शास्त्रज्ञ आणि विज्ञानातं रुची असलेले लोक  चर्चेला उपस्थित होते.

डॉ. विजय भाटकर, अध्यक्ष विभा (विज्ञानभारती)  यांनी या चर्चासत्राचे  अध्यक्षपद भूषवले. महिलांना योग्य ते महत्त्व दिले गेले तरच शाश्वत विकास आणि आत्मनिर्भरता शक्य आहे यावर त्यांनी भर दिला.  महिला नवसंशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी  कमी संस्थात्मक यंत्रणेच्या संदर्भात अनेक समस्या आहेत यामध्ये  वयाची मर्यादा,  गळती, महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्ससाठी निधी, नेतृत्व, लिंग पूर्वग्रह आणि महिला उद्योजकांची गरज, सर्वसमावेशक आणि वैविध्यपूर्ण एसटीआय परिसंस्था ,  कुटुंब आणि पालकत्व आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.

एसटीआयपी 2020 चे प्रमुख डॉ. अखिलेश गुप्ता यांनी अथेना  'स्वान'  चार्टरच्या भारतीय आवृत्ती अंमलबजावणी बाबत तज्ञांच्या विचारविनिमयामध्ये सुचवण्यात आलेले मुद्दे सादर केले . यात  शैक्षणिक क्षेत्रात अनिवार्य पदे, 30% महिलांचे प्रतिनिधित्व, ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञांना संशोधन आणि प्रशासनात नेतृत्व भूमिका यांचा समावेश होता.  

शक्ती या महिला सक्षमीकरणाच्या राष्ट्रीय चळवळीतील स्वतंत्र संस्थेच्या अंतर्गत देशभरातील 22 राज्यांत पसरलेल्या विज्ञानभारती या स्वदेशी भावनेच्या विज्ञान चळवळीने या  माहिती सत्राचे आयोजन केले होते.

डॉ. गुप्ता यांनी सरकारचे अलिकडचे काही महत्वपूर्ण उपक्रम अधोरेखित केले , यामध्ये डीएसटीच्या “किरण” (प्रोत्साहनाद्वारे  संशोधन प्रगतीमध्ये ज्ञान सहभाग) योजना,  क्यूयूआरआयई (कन्सॉलिडेशन ऑफ युनिव्हर्सिटी रिसर्च फॉर इनोव्हेशन अँड एक्सलन्स इन वुमन युनिव्हर्सिटी) कार्यक्रम, जैव तंत्रज्ञान विभागाचा  बायोकार ई कार्यक्रम आदींचा समावेश होता. 

महिलांसाठी करिअर ब्रेक यासंबंधी मुद्द्यांवर  लक्ष देण्याची गरज असल्यावर  त्यांनी भर देताना दुहेरी भरती धोरण, कामाच्या वेळेत लवचिकता, पाळणाघरे,  ‘ऑफिस ऑफ इक्विटी अँड इन्क्लूजन’ स्थापन करणे आदी उपाय सुचवले. 

डॉ. गुप्ता यांनी विज्ञान व शिक्षणात महिलांच्या सहभागावर भर देताना  लीलावती, गार्गी आणि खाना  यासारख्या थोर महिला वैज्ञानिक आणि विचारवंतांची उदाहरणे देऊन नवीन एसटीआय धोरणाची ओळख करून दिली.  त्यांनी लोकांशी सल्लामसलत करण्यासाठी विशिष्ट संदर्भांसह तयार केलेल्या आराखडा प्रक्रियेची सर्वसमावेशक माहिती दिली आणि एसटीआयपी 2020 मध्ये महिलांच्या सहभागाचे महत्त्व यावर भर  दिला.

तज्ञांनी महिला उद्योजक आणि महिला प्रणित अर्थव्यवस्थेसाठी मदतीचे  नेटवर्क तयार करण्याविषयी सूचना केली. स्पष्ट आणि कठोर अंमलबजावणी रणनीतीची गरज,  धोरणे आणि कार्यक्रमांच्या बाबतीत संवेदनशीलता आणि जागरूकता आणि राज्य विद्यापीठांच्या पुनरुज्जीवनावर भर देण्याची सूचना त्यांनी केली.

STIP- women scientists.jpg


* * *  

M.Iyengar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1657774) Visitor Counter : 184