रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना “आंतरराष्ट्रीय चालक परवान्याच्या पहिल्या पृष्ठावर 19 सप्टेंबर 1949” ची रस्ते वाहतूकीसंबंधीची आंतरराष्ट्रीय परिषद" असा शिक्का मारण्याचा सल्ला
प्रविष्टि तिथि:
21 SEP 2020 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2020
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशासित प्रदेशांना सल्ला दिला आहे की, त्यांनी जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय चालक परवान्यावर (IDP) “19 सप्टेंबर 1949 ची रस्ते वाहतूकीसंबंधीची आंतरराष्ट्रीय परिषद” असा शिक्का मारावा. विविध सार्वजनिक तक्रारींच्या माध्यमातून मंत्रालयाच्या असे निदर्शनास आले आहे की, भारतीय नागरिकांना जारी केलेले आंतरराष्ट्रीय वाहतूक परवाने अनेक देशांकडून स्वीकारले जात नाहीत, तेथील अधिकारी 19 सप्टेंबर 1949 रोजीच्या आंतरराष्ट्रीय रस्ते वाहतूकीसंदर्भातील परिषदेच्या संदर्भाची मागणी करतात.
मंत्रालयाने राज्य/केंद्रशासित प्रदेशांचे वाहतूक सचिव, आयुक्तांना पाठवलेल्या नियमावलीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारलेल्या काही आरटीओंच्या शिक्क्याची प्रतसुद्धा पाठवली आहे.
M.Iyengar/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1657268)
आगंतुक पटल : 171