अर्थ मंत्रालय
35,074 करदात्यांनी केली ‘विवाद से विश्वास’ योजनेची निवड
Posted On:
20 SEP 2020 4:01PM by PIB Mumbai
प्रत्यक्ष करविषयक योजना, “विवाद से विश्वास तक’ ची घोषणा झाल्यापासून, आतापर्यंत 35,074 करदात्यांनी या योजनेची निवड केली आहे. 8 सप्टेंबर 2020 पर्यंत या योजनेचा फॉर्म-1(या योजनेअंतर्गत शपथपत्र) भरला आहे.केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ही माहिती दिली.
याविषयीची अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले की आतापर्यंत या कायद्याअंतर्गत 9,538 कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. या रकमेत, योजनेअंतर्गत अद्याप शपथपत्र सादर न केलेल्या करदात्यांनी भरलेल्या पैशांचा समावेश नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या योजनेअंतर्गत शपथपत्र भरण्यासाठीची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
****
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656945)
Visitor Counter : 162