उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींच्या मध्यस्थीनंतर नेल्लोर जिल्ह्यात तांदुळ खरेदीचे लक्ष्य वाढविण्यास केंद्र सरकारची सहमती
Posted On:
18 SEP 2020 8:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2020
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने नेल्लोर जिल्ह्यातील तांदुळ खरेदीचे लक्ष्य रब्बी हंगामासाठी 34.8 लाख मेट्रीक टन करण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच नेल्लोर जिल्ह्यातील तांदुळ खरेदी हंगाम 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढवण्यात आला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारकडे लक्ष्य वाढवून खरेदीचा कालावधी वाढवण्याची विनंती केली होती.
उपराष्ट्रपतींनी अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्याचे सचिव, कृषी सचिव आणि गृहसचिवांशी चर्चा केली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारने केलेल्या विनंतीनुसार, खरेदीप्रक्रियेच्या सार्वत्रिक निकषात सूट देऊन नुकसानीची पाहणी करण्यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली, कृषी सचिवांनी उपराष्ट्रपतींना माहिती दिली की, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान नैसर्गिक आपत्तीत गणले जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या मदत निधीतून अर्थसहाय्य करावे लागेल.
पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एफसीआय डेपोमध्ये उकड्या तांदूळ (boiled rice) स्वीकारण्याच्या राज्य सरकारच्या विनंतीसंदर्भात, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या सचिवांनी उपराष्ट्रपतींना सांगितले की, वाहतुकीचा खर्च राज्य सरकारने केल्यास कृषीमंत्रालयाची राज्य सरकारच्या प्रस्तावाला हरकत नाही.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656430)