युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

एनवायकेएस जगातील सर्वात मोठ्या युवा संघटनांपैकी एक आहे:  किरेन रिजिजू

Posted On: 17 SEP 2020 6:38PM by PIB Mumbai

 

युवक कल्याण आणि  क्रीडा मंत्रालय त्यांच्या तीन प्रमुख योजनांच्या माध्यमातून -(i) राष्ट्रीय युवाशक्तीकरण कार्यक्रम  (ii) राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) (iii) राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था (आरजीएनआयवायडी) युवकांच्या विकासासाठी विविध  युवा केंद्रित उपक्रम राबवते.

 

युवक कल्याण विभागाच्या योजनांच्या माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा.

 

युवक कल्याण आणि क्रीडा  मंत्रालयांतर्गत युवकांच्या विकासासाठी तीन संघटना कार्यरत आहेत (i) नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस); (ii) राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि (iii) आरजी राष्ट्रीय युवा विकास संस्था (आरजीएनआयवायडी). या संस्था खालीलप्रमाणे आहेतः

आरजी राष्ट्रीय युवा विकास संस्था (आरजीएनआयवायडी): आरजीएनआयवायडी, श्रीपेरंबुदूर, तामिळनाडू, ही केंद्र  सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत एक राष्ट्रीय महत्वाची संस्थाआहे. देशभरात व्याप्ती वाढवण्याबरोबरच आरजीएनआयवायडी एक महत्त्वपूर्ण संसाधन केंद्र म्हणून कार्य करत आहे ज्यात युवा-विकासाच्या विविध आयामांचा समावेश असलेल्या पदव्युत्तर स्तरावरील शैक्षणिक कार्यक्रम उपलब्ध करणेयुवा विकासाच्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रभावी संशोधनात सहभागी करून घेणे आणि त्या क्षेत्रात प्रशिक्षण / क्षमता निर्माण कार्यक्रमांचे आयोजन करते.

नेहरू युवा केंद्र संघटना (एनवायकेएस): एनवायकेएस जगातील सर्वात मोठ्या युवा संघटनांपैकी एक आहे. नेहरू युवा केंद्रांमार्फत 623  जिल्ह्यांमध्ये एनवायकेएसची उपस्थिती आहे. तरुणांचे व्यक्तिमत्त्व विकसित करणे आणि त्यांना राष्ट्र-निर्माण कार्यात सहभागी करणे  हा उद्देश आहे. एनवायकेएस उपक्रमांचा भर असलेल्या  क्षेत्रामध्ये शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक विषयांवर जागरूकता, महिला सक्षमीकरण, नागरी शिक्षण, आपत्ती निवारण आणि पुनर्वसन इत्यादींचा समावेश आहे.

राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस): राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) 1969 मध्ये स्वयंसेवी समुदाय सेवेद्वारे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य विकसित करण्याच्या प्राथमिक उद्देशाने सुरू केली गेली. सेवेद्वारे शिक्षणहा एनएसएसचा उद्देश आहे. एनएसएसची वैचारिक अभिमुखता महात्मा गांधींच्या आदर्शांनी प्रेरित आहे. एनएसएसचा हेतू मी नाहीतुम्ही ” (‘(स्वयं से पहले आप’)  आहे.

सध्या देशभरातील 36 लाख युवा स्वयंसेवकांच्या सदस्यत्व असलेल्या नेहरू युवा केंद्र संघटनेशी संलग्न 1.87  लाख युथ क्लब असून एनएसएसमध्ये 479  विद्यापीठे,17676  महाविद्यालये / तांत्रिक संस्था आणि 12087 उच्च माध्यमिक शाळांमध्ये नोंदणीकृत सुमारे 40 लाख स्वयंसेवक आहेत.

केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) किरेन रीजीजू यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1655742) Visitor Counter : 248