गृह मंत्रालय
दाक्षिणात्य राज्यांमध्ये इस्लामी दहशतवादी
Posted On:
16 SEP 2020 8:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2020
काही विविध राज्यांमध्ये, ज्यात देशाच्या दक्षिण भागातील राज्यांचाही समावेश असून, या राज्यातील काही व्यक्ती इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत सामील झाले असल्याची माहिती केंद्रीय आणि राज्याच्या सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने तेलंगणा, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये इस्लामिक स्टेटचे अस्तित्व असल्याप्रकरणी, 12 खटले दाखल केले असून या संदर्भात आतापर्यंत 122 जणांना अटक केली आहे.
ईस्लामिक स्टेट/ ईस्लामिक स्टेट ऑफ ईराक आणि लेवंट/ईस्लामिक स्टेट ऑफ ईराक आणि सिरीया/दैश/इस्लामिक स्टेट इन खोरासन प्रांत(ISKP)/ ISIS विलायत खोरासन/ईस्लामिक स्टेट ऑफ ईराक आणि शाम-खोरासन (ISIS-K) आणि तिथल्या सर्व कार्यरत संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे . तसेच या सर्व संस्थांचा समावेश, केंद्र सरकारनेअवैध कारवाई(प्रतिबंधक) कायदा, 1967 अंतर्गत करण्यात आला आहे. आपल्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी ईस्लामिक स्टेट सोशल मिडियाचा वापर करत असते. या संदर्भात, सायबर स्पेसकडे सर्व सुरक्षा यंत्रणांचे बारीक लक्ष असून कायद्याप्रमाणे आवश्यक ती कारवाई देखील करण्यात येत आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)नी दिलेल्या माहितीनुसार, आयएस ही संघटना केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि जम्मू कश्मीर या राज्यांमध्ये अधिक सक्रीय आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्यसभेत एका लिखित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1655303)
Visitor Counter : 114