संरक्षण मंत्रालय

संरक्षण सेवांमध्ये कोविडबाधितांची संख्या

Posted On: 16 SEP 2020 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 
स्थलसेना, नौदल आणि हवाईदल अशा तिन्ही संरक्षण सेवांमध्ये मिळून कोविडबाधितांची नेमकी संख्या किती आहे, याची माहिती आज राज्यसभेत देण्यात आली. यानुसार अनुक्रमे स्थलसेनेमध्ये 16,758, नौसेनेमध्ये 1365 आणि वायूसेनेमध्ये 1716 जणांना कोविड-19 ची बाधा झाली आहे.

कोविड-19 मुळे स्थलसेनेतल्या 32 जणांना आणि हवाईदलातील तिघांना आत्तापर्यंत प्राण गमवावे लागले आहेत.

सध्या अस्तित्वात असलेल्या संरक्षण खात्याच्या नियमांनुसार सेवेत असताना संसर्गजन्य आजारांमुळे निधन झाल्यास वेगळी किंवा विशेष नुकसान भरपाई दिली जात नाही. तथापि कार्यरत असताना निधन झाल्यामुळे जे लाभ मयत व्यक्तिंच्या वारसांना मिळतात, ते सर्व दिले जात आहेत.

अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेमध्ये एक लेखी उत्तरामध्ये दिली. यासंबंधी अनुमुला रेवंत रेड्डी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.


* * *

S.Thakur/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1655275) Visitor Counter : 174