वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

चिनी उत्पादनांवर बंदी

Posted On: 16 SEP 2020 6:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

उदयोन्मुख व्यापार आणि आर्थिक घटकांच्या आधारावर सरकार, देशाच्या आयात धोरणाचा नियमितपणे आढावा घेत असते. राष्ट्रीय आणि लोकहिताच्या मूल्यांकनानुसार आयातीच्या नियमनाबाबत निर्णय घेतले जातात. सध्या, परराष्ट्र व्यापार धोरणांतर्गत आयात वस्तूंसाठी अंदाजे 550 टॅरिफ लाईन्स ‘प्रतिबंधित’ / ‘निषिद्ध’ श्रेणीअंतर्गत आहेत, त्यासाठीची आयात चीनसह सर्व देशांकडून प्रतिबंधित करण्यात आली आहे.

देशांतर्गत क्षमतांना साहाय्य करण्यासाठी आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी सरकार, व्यवसाय सुलभीकरण आणि उत्पादन संबंधित मदत यांच्या माध्यमातून योजनांची अंमलबजावणी करत देशांतर्गत उत्पादनाला चालना देत आहे. वरील योजना आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांनादेखील लागू आहेत. 

जागतिक अर्थव्यवस्था जसजशी सुधारते तसतसा उपायांचा उद्योग क्षेत्रावरील परिणाम दिसून येईल.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

M.Chopade/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655186) Visitor Counter : 146