आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड प्रतिबंधात्मक लस विकासाविषयी भारतामधील स्थिती

Posted On: 15 SEP 2020 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  15 सप्टेंबर  2020

देशातला कोविड-19 महामारीचा झालेला उद्रेक लक्षात घेवून भारत सरकार आणि या क्षेत्रातले संशोधन, उद्योग व्यावसायिक  शक्य तितक्या लवकर कोविड प्रतिबंधात्मक प्रभावी लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र लस विकसित करण्यासाठी असलेली गुंतागुंतीची प्रक्रिया लक्षात घेता नेमकी कधी ही लस उपलब्ध होवू शकेल, याविषयी भाष्य करणे अवघड आहे.

कोविड प्रतिबंधात्मक लस विकसित करण्याच्या कार्यासाठी सरकारही  विविध स्तरावर मदत करीत आहे. यासाठी सरकारने उच्चस्तरीय राष्ट्रीय तज्ज्ञांचा समूह स्थापन केला आहे. त्याचे अध्यक्ष निती आयोगाचे सदस्य आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव आहेत. इतर सदस्यांमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव, जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव, आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक, अखिल भारतीय आयुर्विज्ञान  संस्थेचे म्हणजेच एम्सचे संचालक, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचे विभाग प्रमुख, जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक,त्याचबरोबर राज्यांचे प्रतिनिधी, व्यय विभागाचे प्रतिनिधी, यांचा समावेष आहे. लस वितरण करणे, योग्य लस निवडणे, खरेदी करणे, समूहांचे प्राधान्यक्रम, पुरवठा व्यवस्था, शीतगृहांच्या साखळीची आवश्यकता, वित्तीय तरतूद, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यांचा सहभाग, याविषयी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी चर्चा सध्या करण्यात येत आहे.

सीडीएससीको म्हणजेच केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने भारतामध्ये पुढील औषध निर्मात्यांना कोविड-19 प्रतिबंधात्मक लस तयार करण्यासाठी आणि तिची चाचणी, परीक्षण आणि त्याचे विश्लेषण करण्याची परवानगी दिली आहे.

  1. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रा. लि. पुणे.
  2. कॅडिला हेल्थकेअर लि. अहमदाबाद
  3. भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. हैद्राबाद
  4. बायोलॉजिकल ई लि. हैद्राबाद
  5. रिलायन्स लाइफ सायन्स प्रा.लि. मुंबई
  6. अरबिंदो फार्मा लि. हैद्राबाद
  7. जनोव्हा बायोफार्मास्युटिकल लि. पुणे

आयसीएमआर म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था ही आरोग्य संशोधन विभागाअंतर्गत कार्यरत असलेली एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार पुढील कंपन्या भारतामध्ये कोविड-19 प्रतिबंधात्मक लस तयार करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या घेत आहेत.

  1. बीबीआयएल म्हणजेच भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. या कंपनीने  सार्स-सीओव्ही-2 चे संपूर्ण विषाणू निष्क्रिय केलेल्या घटकाची लस तयार केली आहे. यासाठी त्यांनी आयसीएमआरच्या पुणे येथे असलेल्या राष्ट्रीय विषाणू संस्थेने विलगीकरणातून उपलब्ध करून दिलेले विषाणू वापरले आहेत. सुरक्षितता आणि सहनशीलता यांचा अभ्यास करण्यासाठी  प्रारंभी उंदीर, आणि ससे यासारख्या लहान प्राण्यांवर त्यांचा वापर करण्यात येतो. या चाचण्यांची प्रगती आत्तापर्यंत पुढीलप्रमाणे दिसू आली आहे. पहिला टप्पा  वैद्यकीय चाचण्यांबरोबरच त्याला संमातर अशा मोठ्या प्राण्यांवर करण्यात येणार अभ्यास पूर्ण झाला आहे. या चाचण्यांमध्ये लस उत्कृष्ट असून तिच्यामुळे सुरक्षा चांगली होवू शकणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. तसेच प्रतिरक्षा क्षमतेची चाचणी सध्या प्रगतिपथावर आहे. यासाठी दुसऱ्या चरणामध्ये वैद्यकीय चाचण्या घेण्यात येत आहेत.
  2. कॅडिला हेल्थकेअर लि.च्यावतीने डीएनए लस (झीकोव्ह-डी) विकसित करण्यात आली आहे. या लशीच्या विषाक्तपणाचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारा प्रयोग पूर्व वैद्यकीय चाचणी म्हणून उंदीर, ससे आणि गिनीपिग यांच्यावर करण्यात आली आहे. ही लस सुरक्षित असून तिची प्रतिरक्षा क्षमताही चांगली आहे, असे दिसून आले आहे. त्याचबरोबर  आता मोठ्या प्राण्यांविषयी समांतर अभ्यास आणि प्रयोग करण्यासाठी कॅडिलाने आयसीएमआरबरोबर भागीदारी केली आहे. या वैद्यकीय चाचण्यांची सद्यस्थिती पुढील प्रमाणे आहे.

पहिल्या टप्प्यातल्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचणीमध्ये लस उत्कृष्ट सुरक्षा  प्रदान करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता प्रतिरक्षा क्षमतेची चाचणी प्रगतिपथावर आहे.

दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत.

  1. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि आयसीएमआर यांनी भागीदारी करून जागतिक स्तरावरचे दोन ‘उमेदवार’निवडून त्यांच्यावर संशोधन करून लस विकसित करीत आहे.

सीएचएडीऑक्स1-एस, ही ऑक्सफर्ड / ॲस्ट्रा झेनेका विद्यापीठाने विकसित केलेली, प्रतिकृती नसलेली व्हायरल व्हेक्टर लस आहे. या लशीच्या ब्राझिलमध्ये तिस-या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या घेण्यात येत आहेत. आयसीएमआरने दुस-या आणि पहिल्या टप्प्यातल्या चाचण्यांचा एकत्रित अभ्यास सुरू केला आहे. आत्तापर्यंत आयसीएमआरने 14 वैद्यकीय चाचण्या घेण्यामध्ये पुढाकार घेतला आहे. आयसीएमआर आणि चेन्नईची एनआयआरटी ही संस्था या चाचण्या घेण्यात आघाडीवर आहेत.

अमेरिकेमार्फत विकसित करण्यात येत असलेल्या नोवावॅक्स ही लस ग्लायकोप्रोटिनचा अतिसूक्ष्म भाग वापरण्यात आला आहे. यामध्ये आयसीएमआर आणि एसआयआय यांनी भागीदारी केली आहे. या लशीच्या वैद्यकीय चाचण्या ऑक्टोबरच्या उत्तरार्धात सुरू होतील. विशेष म्हणजे या लसीचे उत्पादन पुण्याची एसआयआय ही संस्था करणार आहे. आयसीएमआर आणि एनएआरआय म्हणजेच राष्ट्रीय एडस् संशोधन संस्था यांच्या नेतृत्वाखालीही वैद्यकीय चाचण्या करण्यात येत आहेत.

डीबीटी म्हणजेच जैवतंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 30 पेक्षा जास्त ठिकाणी लस विकसित करण्यासाठी संशोधन वेगवेगळ्या टप्प्यांपर्यंत आले आहे.

आयसीएमआरने लस विकसित करण्यासाठी संशोधन, अभ्यासासाठी 25 कोटींचे वितरण केले आहे.

विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने कोविड-19 अंतर्गत उच्च प्राथमिकता संशोधन करण्यासाठी तीन प्रकल्पांना मान्यता दिली आहे. यासाठी 22,27,579 रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. यासाठी 3,20,78,161 रुपये खर्च करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.

जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातल्या आठ उमेदवारांच्या  लस विकसित करणे आणि त्यासंबंधित संशोधनासाठी एकूण 75 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे.

कोविड-19 लस संशोधनामध्ये भारताने केलेल्या प्रगतीची आणि सद्यस्थितीची ही माहिती आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चैबे यांनी राज्यसभेमध्ये एका लेखी उत्तरामध्ये दिली.

 

M.Iyengar/S.Bedekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654637) Visitor Counter : 227