आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशात कोविड 19 महामारी उद्रेकाचे प्रारंभिक संकेत
प्रविष्टि तिथि:
15 SEP 2020 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2020
6 जानेवारी, 2020 रोजी चीनच्या वुहान शहरात अज्ञात मूळ असलेल्या न्यूमोनियाचा प्रादुर्भाव झाल्याने जगतिक आरोग्य संघटनेने आपल्या देशाला सावध केले तेव्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय चीनमध्ये उदभवलेल्या परिस्थितीचा पाठपुरावा घेत होता. आरोग्य सेवा महासंचालक अंतर्गत संयुक्त देखरेख गटाची चीनमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 8 जानेवारी, 2020 रोजी बैठक झाली आणि सार्वजनिक आरोग्य सज्जता आणि प्रतिसाद धोरण यावर विस्तृत चर्चा केली.
देशव्यापी टाळेबंदीपूर्वी, उदभवणाऱ्या परिस्थितीनुसार सक्रिय , श्रेणीबद्ध आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या .
रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, 18 जानेवारी, 2020 रोजी बंदर, विमानतळ आणि सीमेवर प्रभावित देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी भारताने प्रवाशांची चाचणी करायला सुरुवात केली. त्यानंतर सर्वच प्रवाशांसाठी सार्वत्रिक तपासणी करण्यात आली. एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रम समाजातील या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा आणि संशयितांचे संपर्क आणि बाधित रुग्णांचा पाठपुरावा करत आहे. अशा सर्व राज्ये / जिल्ह्यांमध्ये आढळलेल्या प्रकरणांमध्ये समूह आणि मोठा उद्रेक रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक धोरण अवलंबण्यात आले. देखरेख, संपर्कात आलेल्यांचा शोध, नमुना संकलन व वाहतूक, क्लिनिकल व्यवस्थापन, रुग्णांना घरी सोडण्याबाबतचे धोरण, संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण व गृह विलगीकरण संबंधी प्रवासी मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या.
18 जानेवारी, 2020. पासून आंतरराष्ट्रीय प्रवाषांची तपासणी, देखरेख, संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी भारताने पुरेशी कारवाई केली. आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा ओघ रोखण्यासाठी प्रवासी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या.
कोविड बाधित देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवेशाच्या ठिकाणी तपासणी सुरु करण्यात आली आणि त्यानंतर सार्वत्रिक तपासणी करण्यात आली. 25 मार्च 2020 रोजी टाळेबंदीपूर्वी या विमानतळांवर एकूण 14,154 उड्डाणांमधील 15,24,266 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. 12 प्रमुख आणि 65 लहान बंदरे आणि सीमारेषेवर देखील तपासणी करण्यात आली. विमानतळांव्यतिरिक्त, सीमेवर सुमारे 16.31 लाख व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आणि 12 प्रमुख , 65 लहान बंदरांवर सुमारे 86,379 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. योग्य तपासणी आणि स्क्रीनिंगमध्ये आढळलेल्या संशयित प्रकरणांचे व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी विमानतळ आणि त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांच्या तपासणीसाठी बहु-शाखीय केंद्रीय पथके तैनात करण्यात आली होती.
राज्यमंत्री (आरोग्य आणि कुटुंब कल्याण), अश्विनीकुमार चौबे यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
M.Iyengar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1654517)
आगंतुक पटल : 206