पर्यटन मंत्रालय

कोविड-19  संक्रमणामुळे पर्यटन क्षेत्रात उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून विविध उपाययोजना - पर्यटन मंत्री

Posted On: 14 SEP 2020 9:23PM by PIB Mumbai

 

कोविड-19 संक्रमणामुळे पर्यटन क्षेत्रात उद्भवलेल्या संकटावर मात करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून पुढील उपाययोजना करण्यात आल्या:

(i) मार्गदर्शक सूचनांचे पालन आणि जागरूकता, प्रशिक्षण आणि नियमांचे मूल्यांकन करण्यासाठी कोविड सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी सविस्तर कार्यात्मक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली.

 (ii) हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बी&बी/ होम स्टे आणि पर्यटन सेवा प्रदात्यांना व्यवसायाची सुरळीत सुरुवात करण्यासाठी 08.06.2020 रोजी कार्यात्मक शिफारसी करण्याता आल्या. 

 (iii) मंजुरी किंवा प्रमाणपत्रांची वैधता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे

(iv)   मंत्रालयाने साथी’ (हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी मूल्यांकन, जागरूकता आणि प्रशिक्षण यासाठीची प्रणाली) या उपक्रमाच्या माध्यमातून कोविड-19 संदर्भातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली.

 (v)    पर्यटन मंत्रालयाने ट्रॅव्हल एजंट्स, टूर ऑपरेटर, टूरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर यांची मान्यता स्वयंचलित रितीने सहा महिन्यांपर्यंत वाढविली.

(vi) विपणन विकास सहाय्य योजनेंतर्गत भागधारकांना आर्थिक सहाय्य देण्याच्या मार्गदर्शक सूचना योजनेची व्याप्ती आणि पोहोच वाढविण्यासाठी पुनरावृत्ती योजनेवर काम सुरु आहे.

(vii)  मंत्रालयाने देखो अपना देश (DAD)  उपक्रमाची जानेवारी 2020 मध्ये सुरुवात केली. मंत्रालयाच्या समाजमाध्यम खात्यांवर आणि संकेतस्थळावर आणि भारत पर्यटन कार्यालयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात आला.

(viii)    मंत्रालयाने देशातील पर्यटनावर लक्ष केंद्रित केले आहे ज्यात देशातील उत्पादने, उत्सव, पाककृती इत्यादींची जाहिरात करणे आणि सोशल मीडियावरुन देशातील पर्यटनावर भर देणे यांचा समावेश आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेला चालना देण्यासाठी अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्थळांच्या जाहिरातीसाठी टाळेबंदीच्या काळात त्यांचे हवाई छायाचित्रण करण्यात आले आहे.

केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद सिंग पटेल यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

M.Chopade/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654239) Visitor Counter : 160