श्रम आणि रोजगार मंत्रालय

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण तरतुदी कायदा-1952 अंतर्गत, अर्ध-न्यायिक खटल्यांची आभासी सुनावणी सुरु करत, जलद आणि वाजवी न्यायप्रक्रीयेच्या युगाचे बिगुल

प्रविष्टि तिथि: 14 SEP 2020 6:52PM by PIB Mumbai

 

EPF & MP Act, 1952 म्हणजेच, कर्मचारी भविष्य निर्वाह आणि संकीर्ण तरतुदी कायद्याअंतर्गत, अर्ध-न्यायिक प्रकरणांच्या आभासी सुनावणीला सुरुवात करुन, एकप्रकारे जलद आणि वाजवी दरातील न्यायप्रक्रियेच्या युगाचे बिगुल वाजवण्यात आले आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय- EPFO यांनी अलिकडे राबवलेल्या विविध उपक्रमांपैकी हा एक उपक्रम असून कार्यसुलभता आणण्यासाठी अर्ध न्यायिक प्रकरणांची सुरक्षित माहिती तंत्रज्ञानाच्या वापरासह आभासी स्वरुपात सुनावणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांच्या हस्ते, 9 सप्टेंबर रोजी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त सभेच्या 227 व्या बैठकीत या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.  

कोविड-19 चा आजार आणि त्यामुळे पाळावे लागणारे शारीरिक अंतराचे नियम, यामुळे, सर्वोच्च न्यायालय आणि संबंधित उच्च न्यायालयांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, विविध जिल्हा आणि सत्र न्यायालयात आभासी स्वरूपात सुनावणी घेतली जात आहे.

याच धर्तीवर आणि आपली संस्था तसेच ग्राहकांना जलद आणि वाजवी दरात न्यायप्रक्रियेची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण तरतुदी कायदा 1952 च्या कलम 7A आणि 14B नुसार, अर्ध-न्यायिक खटल्यांची सुनावणीही आभासी स्वरूपात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

आभासी न्यायालयात व्यक्तीने प्रत्यक्ष हजार राहण्याची गरज नसते. यात ऑनलाईन स्वरुपात खटले चालवले जातात.

या सुविधेसाठी, आभासी स्वरूपातील सुनावणीला, EPFO च्या ई-न्यायालय प्रक्रियेशी, ई प्रक्रिया पोर्टलच्या (https://eproceedings.epfindia.gov.in ) माध्यमातून जोडण्यात आले आहे.  यामुळे, ई-नोटीस बजावणे, प्रक्रियेची तत्क्षणी नोंद ठेवणे आणि आदेश पाठवणे अशा सुविधा देता येतील. खटल्यांशी सबंधित सर्वांना या पोर्टलवर खटल्याच्या सद्यस्थितीविषयीची माहिती देखील मिळू शकेल.  

--

M.Chopade/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1654165) आगंतुक पटल : 210
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Tamil , Malayalam