विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कृष्णा-गोदावरी (केजी) खोरे, मिथेन इंधनाचा उत्कृष्ट स्रोत

Posted On: 12 SEP 2020 5:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 सप्टेंबर  2020

 

जगात जीवाश्म इंधन संपत आहे आणि स्वच्छ उर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध सुरु आहे, त्यात कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यातून एक चांगली बातमी आहे. या खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे मिथेन या नैसर्गिक वायूचा पुरेसा पुरवठा होईल. 

मिथेन स्वच्छ आणि स्वस्त इंधन आहे. असा अंदाज आहे की, एक क्युबिक मीटर मिथेन हायड्रेटमध्ये 160-180 क्युबिक मीटर मिथेन असते. कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील मिथेन हायड्रेटसचा अगदी कमी अंदाज केला तरी, ते जगातील जीवाश्म इंधन साठ्यांच्या तुलनेत दुप्पट आहे.

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेली स्वायत्त संस्था आघारकर संशोधन संस्थेने नुकत्याच केलेल्या अभ्यासात आढळले आहे की, कृष्णा-गोदावरी खोऱ्यात आढळलेले मिथेन हायड्रेट साठे बायोजेनिक मूळ असलेले आहेत. हायड्रोजन-बंधित पाणी आणि मिथेन वायू सागरामध्ये उच्च दाब आणि कमी तापमानाला एकत्र आले असता मिथेन हायड्रेटची निर्मिती होते.

आघारकर संस्थेच्या संशोधनात असेही आढळले आहे की, मिथेन हायड्रेट म्हणून सांधलेल्या बायोजेनिक मिथेनची निर्मिती करणार्‍या मिथेनोजेन शोधून काढले, जे उर्जेचा महत्त्वपूर्ण स्रोत असू शकते. हा अभ्यास ‘मरीन जिनोमिक्स’ या जर्नलमध्ये प्रकाशनासाठी स्वीकारण्यात आला आहे.

कृष्णा-गोदावरी (केजी) खोरे आणि अंदमान आणि महानदीच्या किनाऱ्याजवळ जैविक उत्पत्ती असलेला हायड्रेट साठा भरीव प्रमाणात आहे, त्यामुळे संबंधित मिथेनोजेनिक समुदायाचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असे अभ्यासाचे प्रमुख अन्वेषक डॉ विक्रम लांजेकर म्हणाले. 

एआरआय टीमच्या म्हणण्यानुसार, अलीकडील काळापर्यंत, मिथेन हायड्रेट-बेअरिंग सिलमेंट्सशी संबंधित मेथनोजेनिक समुदायाबद्दल कमी शोधकार्य झाले आहे. या अभ्यासाने असे सिद्ध केले आहे की या उच्च दाब आणि तापमानाच्या परिस्थितीत मिथेनोजेन या परिस्थितीशी चांगल्या प्रकारे जुळवून घेत आहे आणि मिथेन-उत्पादनाच्या कार्यापेक्षा भिन्न आहे. अशा वातावरणाखाली या मिथेन-उत्पादित मिथेनोजेनिक समुदायाचे आकलन होणे फार महत्वाचे आहे. आण्विक आणि कल्चरिंग टेक्निक्सचा वापर करून केलेल्या या अभ्यासातून केजी बेसिनमध्ये जास्तीत जास्त मेटाथोजेनिक वैविध्य आढळले, जे अंदमान आणि महानदी खोऱ्याच्या तुलनेत बायोजेनिक मिथेनचा मोठा स्रोत असल्याचे निश्चित करते.

आकृती 1: मेथेनोसार्सिना स्पे. एमएसएच 10X1 निळसर-हिरवे अतिनील मायक्रोस्कोप अंतर्गत फ्लोरोसेंस

आकृती  2: मेथेनोसार्सिना स्पे. एमएसएच 10X1 मेथनोजेनसाठी अनरोबिक माध्यम असलेली रोल बाटलीमध्ये वेगळ्या वसाहत

 

M.Jaitly/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1653614) Visitor Counter : 270