पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी 'गृह प्रवेशम' कार्यक्रमाला केले संबोधित
मध्य प्रदेशात पीएमएवाय-जी अंतर्गत लाभार्थ्यांशी साधला संवाद
Posted On:
12 SEP 2020 4:25PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील ‘गृहप्रवेशम’ कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान आवास योजना - ग्रामीण (पीएमएवाय-जी) अंतर्गत 1.75 लाख कुटुंबांना पक्की घरे देण्यात आली.
नरेंद्र मोदी यांनी पीएमएवाय-जी अंतर्गत मध्य प्रदेशातील लाभार्थ्यांशी संवाद देखील साधला.
पंतप्रधान म्हणाले की आज 1.75 लाख लाभार्थी कुटुंबे , जी आपल्या नवीन घरांमध्ये जात आहेत , त्यांना त्यांचे स्वप्नातील घर आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याबद्दल आत्मविश्वास मिळाला आहे. ते म्हणाले की, ज्या लाभार्थींना आज घरे मिळाली आहेत , ते गेल्या 6 वर्षात स्वतःचे घर लाभलेल्या 2.25 कोटी कुटुंबांमध्ये सामील झाले आहेत आणि आता भाड्याच्या घरात किंवा झोपडपट्टीत किंवा कच्च्या घरात राहण्याऐवजी ते स्वतःच्या घरात राहतील. त्यांनी लाभार्थींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाले कि कोरोना नसता तर त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी ते स्वतः वैयक्तिकरीत्या उपस्थित राहिले असते.
पंतप्रधान म्हणाले की आजचा दिवस हा केवळ 1.75 लाख गरीब कुटुंबांच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण नाही तर देशातील प्रत्येक बेघर व्यक्तीला पक्के घर देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ते म्हणाले की यामुळे देशातील बेघरांची आशा बळकट होईल . सरकारी योजनांची योग्य रणनीतीसह आणि हेतूने अंमलबजावणी केली की त्या योजना लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचतात हे यातून सिद्ध झाले आहे.
पंतप्रधान म्हणाले की कोरोना कालावधीत आव्हाने असूनही या काळात आपल्या गरीब बांधवांसाठी घरे बांधण्याचे काम आम्ही केले आहे.
पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत देशभरात 18 लाख घरांचे काम पूर्ण झाले असून त्यापैकी मध्य प्रदेशातच 1.75 लाख घरे बांधून पूर्ण झाली आहेत. ते म्हणाले की पीएमएवाय-जी अंतर्गत घर बांधण्यासाठी साधारणत: 125 दिवस लागतात परंतु कोरोनाच्या या काळात ते केवळ 45 ते 60 दिवसातच पूर्ण झाले जो एक विक्रम आहे. ते म्हणाले की शहरांमधून गावात परतलेल्या स्थलांतरितांमुळे हे शक्य झाले आहे. आव्हानांना संधीमध्ये बदलण्याचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की या गरीब स्थलांतरित कामगारांनी पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार अभियानाचा पुरेपूर फायदा घेऊन आपल्या कुटुंबाची काळजी घेतली आणि त्याचवेळी आपल्या गरीब बांधवांसाठी घरे बांधण्याचे काम देखील केले.
पंतप्रधान गरीब कल्याण अभियानांतर्गत मध्य प्रदेशातील प्रकल्पांसह देशातील अनेक राज्यांमध्ये सुमारे 23 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, या योजनेंतर्गत, प्रत्येक गावात गरीबांसाठी घरे बांधली जात आहेत, प्रत्येक घराला पाणीपुरवठा करण्यासाठी कामे सुरू आहेत, अंगणवाड्या आणि पंचायतींसाठी इमारती बांधल्या आहेत, तसेच गायींसाठी गोठे, तलाव, विहिरी इ.बांधल्या जात आहेत.
ते म्हणाले की याचे दोन फायदे झाले आहेत. शहरांमधून आपल्या गावी परत आलेल्या लाखो स्थलांतरित मजुरांना अर्थपूर्ण रोजगार मिळाला आहे. आणि दुसरे - विट, सिमेंट, वाळू इत्यादीं बांधकामाशी संबंधित वस्तूंची विक्री झाली आहे. ते म्हणाले की एक प्रकारे या कठीण काळात पंतप्रधान गरीब कल्याण रोजगार अभियान हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा आधार म्हणून उदयाला आले.
पंतप्रधान म्हणाले की पीएम आवास योजनेअंतर्गत बांधलेली घरे बहुतांश महिलांच्या नावे नोंदवली जातात किंवा घरातील महिलेबरोबर संयुक्तपणे नोंदणी केली जातात. नवीन कामाच्या संधी निर्माण केल्या जात आहेत आणि त्याच वेळी, बांधकामासाठी मोठ्या संख्येने महिला गवंडीची मदत घेतली जात आहे. ते म्हणाले की, एकट्या मध्य प्रदेशात 50 हजार पेक्षा अधिक गवंडीना प्रशिक्षण देण्यात आले , त्यापैकी 9,000 महिला आहेत. गरीबांचे उत्पन्न वाढले की त्यांचा आत्मविश्वास वाढतो. आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्याचा संकल्पही बळकट होतो. पंतप्रधान म्हणाले की हा आत्मविश्वास बळकट करण्यासाठी 2014. पासून प्रत्येक गावात आधुनिक पायाभूत सुविधा विकसित केल्या जात आहेत.
पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2020 रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरुन दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देताना आगामी 1000 दिवसांत सुमारे 6 हजार गावात ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याविषयी उल्लेख केला. ते म्हणाले की, या कठीण काळातही प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत हे काम वेगाने सुरु आहे. ते म्हणाले की, काही आठवड्यांतच 116 जिल्ह्यात 5000 किलोमीटरपेक्षा जास्त ऑप्टिकल फायबर टाकण्यात आले आहे. ते म्हणाले की सुमारे 1250 पेक्षा जास्त ग्रामपंचायती जवळपास 19 हजार ऑप्टिकल फायबर कनेक्शनशी जोडल्या आहेत आणि सुमारे 15 हजार वाय-फाय हॉटस्पॉट देण्यात आले आहेत. ते म्हणाले की जेव्हा गावात चांगले व वेगवान इंटरनेट येईल तेव्हा गावातील मुलांना शिक्षणासाठी चांगल्या संधी मिळतील आणि तरुणांना व्यवसायाच्या चांगल्या संधी मिळतील. ते म्हणाले की आज सरकारची प्रत्येक सेवा ऑनलाईन करण्यात आली आहे जेणेकरून त्याचा लाभही वेगवान व्हावा, भ्रष्टाचार होत नाही आणि छोट्या कामासाठीही ग्रामस्थांना शहरात यावे लागत नाही. ते म्हणाले की, गाव आणि गरीबांना सक्षम बनवण्यासाठी आता त्याच आत्मविश्वासाने ही मोहीम अधिक वेगवान होईल.
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653603)
Visitor Counter : 265
Read this release in:
Tamil
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam