पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
अवैध वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्यांनी कठोर कायदे करत त्यांची अंमलबजावणी करावी- प्रकाश जावडेकर यांची सूचना
वनशहीद दिवसानिमित्त पर्यावरण मंत्र्यांकडून कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या वन कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली
Posted On:
11 SEP 2020 10:14PM by PIB Mumbai
15 व्या राष्ट्रीय वनशहीद दिनानिमित्त आज पर्यावरण मंत्री प्रकश जावडेकर यांनी, कर्तव्य बजावताना शहीद झालेले वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्मरण करत, त्यांना श्रद्धांजली वाहिली. देशातील वृक्षवल्ली, वन्यजीव आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जंगलातील वणवे, तस्कर आणि वाळूमाफियांपासून संरक्षण करतांना जीव गमावलेल्या कर्तव्यतत्पर कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
चंदनाची तस्करी रोखण्याच्या प्रयत्नात मारल्या गेलेल्या अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. चंदन लागवडीबाबतच्या नियमात दुरुस्ती केली जाईल, जेणेकरुन चंदनाची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. वाघ, हत्ती आणि एकशिंगी गेंडा अशा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या वन अधिकाऱ्यांनाही त्यांनी श्रद्धाजंली वाहिली. वर्ष 2019-20 मध्ये कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या वन कर्मचार्यांच्या कुटुंबियांना यावेळी प्रशस्तीपत्र देण्यात आली.
At @moefcc we observed the #ForestMartyrsDay at the national level for the first time, in recognition of forest personnel who sacrificed their lives for the protection of our environment, forest & wildlife.
This year 25 forest staff have been given the certificate of recognition pic.twitter.com/2SaW5eD15J
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) September 11, 2020
वाळू माफियांना कठोर इशारा देत जावडेकर यांनी सांगितले की, वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी परिस्थितीचा पूर्ण आढावा घेऊन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. वाळू उत्खननाबात नवे, शाश्वत कायदे करुनही, अनेक राज्यांमध्ये या नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळले आहे. राजस्थानच्या अलवारमधील व्याघ्र प्रकल्पात, वाळू माफियांना रोखण्याचा प्रयत्न करणारे वनसंरक्षक केवल सिंग यांच्यावर टृक्टर चालवण्यात आले.
सर्व राज्यांनी, वाळू तस्करी आणि वाळू माफियांच्या विषयाकडे गांभीर्याने घ्यावे, आणि या प्रकारांना आळा घालण्यासाठी, कठोर कायदे आणि अंमलबजावणी करावी, अशी सूचना जावडेकर यांनी केली आहे. वाळू उत्खनन करतांना पर्यावरणाच्या नियमांचे पालन करायला हवे, नदीपात्रासारख्या नैसर्गिक स्त्रोतांची हानी होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असेही जावडेकर म्हणाले. तसेच, शाश्वत वाळू उत्खनन होण्यासाठी दक्ष असणाऱ्या वन अथवा महसूल अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले अजिबात क्षम्य नसून अशा लोकांविरुध्द कठोर कारवाई करावी, असेही जावडेकर म्हणाले.
कर्त्तव्य कर रहे रेवेन्यू या फारेस्ट के अधिकारी को मार दिया जाता है ,उनपर हमले होते है यह बिलकुल बर्दाश्त नहीं किया जाएगा |
कड़े कानूनों का निर्माण करेंगे,कड़े दंड के प्रावधान होंगे और ये बहुत जरुरी है नहीं तोअपनी प्रकृति लूट ले जायेंगे,नदी सूख जाएगी। #SustainableSandMining pic.twitter.com/TedTwWKoGr
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) September 11, 2020
भारताची समृध्द आणि वैविध्यपूर्ण जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी समर्पित असे वन अधिकारी आणि कर्मचारी सदैव दक्ष आणि तत्पर असतात. त्यांचे संरक्षण आणि आणि या निसर्गसंपत्तीचे जतन करण्यासाठी हे वनाधिकारी अविरत झटत असतात. या कामात गेल्या अनेक वर्षात अनेक वन अधिकाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे.
वनकर्मचार्यांनी देशाच्या विविध भागात, पर्यावरण, वन आणि वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या या शहीद कर्मचार्यांच्या गौरवार्थ, 11 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय वन शहीद दिवस पाळला जातो.
या दिवसाचे ऐतिहासिक मह्त्व आहे, 11 सप्टेंबर 1730 रोजी बिश्नोई या आदिवासी समुदायाच्या 360 लोकांनी अमृता देवी यांच्या नेतृत्वाखाली झाडे कापण्याला विरोध करत त्या विरुध्द आंदोलन केले. मात्र राजस्थानच्या तेव्हाच्या राजाच्या आदेशावरून या सर्व लोकांची खेर्जाली येथे हत्या करण्यात आली. झाडांच्या संरक्षणासाठी या सर्वांच्या स्मृतीप्रीत्यर्थ 2012 साली, देहरादून येथे स्मृतीस्तंभ उभारण्यात आला आहे.
केंद्रीय वन मंत्रालयाने जापानच्या जायका संस्थेसोबत, 13 राज्यांत ‘वन व्यवस्थापन आणि कर्मचारी प्रशिक्षण तसेच क्षमता विकास” प्रकल्प राबवण्यासाठी करार केला आहे.
***
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653493)
Visitor Counter : 228