उपराष्ट्रपती कार्यालय

मूल्य आधारीत शिक्षण देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


आजच्या या माहितीच्या युगात तरुणांमध्ये योग्य मूल्ये आत्मसात करण्याची जास्त आवश्यकता

Posted On: 11 SEP 2020 5:14PM by PIB Mumbai

 

सर्वांगीण विकासासाठी मूल्य-आधारित शिक्षण देण्याची गरज उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी व्यक्त केली.  शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन मूल्य-आधारित अध्यापन आणि शिक्षण यांना आपल्या शिक्षणपद्धतीचा अविभाज्य भाग केले पाहिजे असे ते म्हणाले.

भारत व भूतानच्या संयुक्त राष्ट्रांच्या माहिती केंद्राच्या सहकार्याने श्री राम चंद्र मिशनच्या वतीने आयोजित हार्टफुलनेस ऑल इंडिया एसए रायटिंग इव्हेंटच्या ऑनलाइन कार्यक्रमात उपराष्ट्रपती बोलत होते.

नायडू यांनी इंग्रजी व्यतिरिक्त दहा प्रमुख भारतीय भाषांमध्ये नोंदी मागविल्या आणि  बहुभाषिक कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला तसेच भविष्यात सर्व भारतीय भाषांचा समावेश होईल अशी आशा व्यक्त केली.

मूल्य-आधारित शिक्षणावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल राष्ट्रीय धोरण - 2020 ची प्रशंसा करताना नायडू म्हणाले की प्राचीन काळापासून मूल्यांवरील भर आपल्या सर्व अध्यापनाचा अविभाज्य भाग राहिला आहे.

सध्याच्या काळात, वेगवान माहिती तंत्रज्ञानाच्या भौतिक जगात मूल्य-आधारित शिक्षणाची आवश्यकता अधिक महत्त्वाची आहे असे ते म्हणाले.

सार्वभौम मूल्यांवर आधारित पाया पुन्हा तयार करण्याची गरज व्यक्त करताना नायडू यांनी आपल्या मुळांकडे परत जाण्याची व आपल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.

आपल्या विद्यापीठांनी भारताला ज्ञान आणि नावीन्याचे अग्रगण्य केंद्र बनविण्यासाठी मानदंडात सुधारणा करावी अशी आशा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. जेव्हा आपण सशक्त मूल्यांबरोबर एकत्र काम करतो तेव्हा प्रत्येक समस्येचे उत्तर आपल्याला मिळते असे ते म्हणाले.

आत्मसंतुष्ट राहू नका आणि आवश्यक खबरदारी घेत रहा असा सल्ला उपराष्ट्रपतींनी यावेळी दिला. लवकरच लसीसाठीच्या जगभरातील चाचण्या यशस्वी होतील आणि आपण कोविड विषाणूचा पराभव करू अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

B.Gokhale/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1653352) Visitor Counter : 185