रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
गुणवत्तेशी तडजोड न करता रस्तेनिर्मितीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर: नितीन गडकरी
केंद्रीय परिवहन मंत्र्यांनी उद्योगांना 10 वर्षांच्या दोष देयतेच्या मुदतीचा मसुदा तयार करण्यास सांगितले, आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा वापर करुन सरकारची तत्पर मदत मिळवण्याचे आवाहन
Posted On:
10 SEP 2020 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2020
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, आणि एमएमएमई खात्याचे मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सरकारचे धोरण रस्तेनिर्मितीचा खर्च कमी करुन गुणवत्ता सुधारणे हा आहे. सरकार यावर काम करत आहे, पण यात आणखी काम करण्याची गरज आहे. फिक्कीने आयोजित केलेल्या ‘बिट्यू-कॉन 2020’ परिषदेत ते बोलत होते.
गडकरी यांनी रस्तेनिर्मितीसाठी प्लॅस्टीक आणि रबर कचऱ्याचा वापर वाढवण्याचे उद्योगांना आवाहन केले, यामुळे पर्यावरणसंरक्षणही होईल. याशिवाय स्टील कारखाने आणि फ्लॅशमधून निघालेल्या ऑईल स्लॅगसारख्या टाकाऊ उत्पादनांच्या वापरासही प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्यूट किंवा काथ्या आणि रस्तेनिर्मिती उत्पादनातील कचरा यासारख्या स्थानिक उत्पादनांचा रस्तेनिर्मितीसाठी वापर केला पाहिजे, यामुळे रस्त्यांचे आयुष्य वाढेल तसेच वाहने चालवण्याचा उत्तम अनुभव मिळेल. तसेच सरकार प्रिकास्ट साठी पॅटर्न डिझाईन तयार करेल, असे गडकरी म्हणाले.
तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्याविषयी बोलताना गडकरी म्हणाले, रस्तेनिर्मितीत उद्योगांनी जागतिक दर्जाच्या तंत्राचा अवलंब करावा. उद्योगजगताने डांबरी रस्त्यांसाठी 10 वर्षांच्या दोष देयतेच्या मुदतीचा मसुदा (डिफेक्ट लायबिलीटी) तयार करण्यास सांगितले, जो सध्या पाच वर्षासाठी आहे.
उद्योगास पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन देताना गडकरी म्हणाले, सरकार खुल्या विचारांचे, पारदर्शक, कालबद्ध, निकालाभिमुख आणि गुणवत्तेसाठी कटिबद्ध आहे. ते म्हणाले, उद्योगांनी सरकारला उद्युक्त करावे, सरकार परवानग्या देण्यास तयार आहे. त्यांनी भर देऊन सांगतिले की, रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा रस्ते, राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांपर्यंत डांबरी रस्त्यांचा विस्तार केला पाहिजे.
गडकरी यांनी पुढे सांगितले की, कोविड-19 च्या परिस्थितीतही सरकार रस्तेनिर्मितीचे काम वेगाने करत आहे आणि वेगाने कंत्राट बहाल करत आहे. या कठीण काळातही रस्तेनिर्मितीचा वेग मंदावला नसल्याचे ते म्हणाले.
सरकारचा कोविड-19 काळातही रस्तेनिर्मितीचा वेग चांगला असल्याचे फिक्कीच्या अध्यक्ष डॉ संगीता रेड्डी म्हणाल्या. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने महामार्ग निर्मितीचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
* * *
M.Chopade/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653180)
Visitor Counter : 142