रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
बिहारमधील मुंगेर – भागलपूर राष्ट्रीय महामार्गासाठी 971 कोटी रुपयांची नितीन गडकरी यांची मंजुरी
Posted On:
10 SEP 2020 7:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2020
केंद्रिय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बिहारमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 80 येथील मुंगेर – भागलपूर – तिरपती – कहलगाँव या 120 किलोमीटर लांबीच्या क्राँक्रीटच्या रस्ते बांधणी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा पोव्ह्ड शोल्डर्स पद्धतीचा असलेला दोन पदरी मार्ग असेल, जो काही ठिकाणी चौपदरी रुंद देखील केला जाईल.
पुढच्या तीन महिन्यात या रस्त्याचे काम सुरू करावे, अशा सूचना श्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या भागातील तातडीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी 20 कोटी रुपये देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
श्री गडकरी यांनी सांगितले की, हा एक महत्त्वाचा व्यावसायिक संपर्काचा मार्ग आहे, यावरून दररोज जवळपास 25 हजार वाहनांची ये – जा होत आहे. या प्रदेशातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन मंत्र्यांनी नवीन राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे ठरविले आहे. ते म्हणाले, हा मार्ग पूर्ण झाल्यामुळे, राज्यातील व्यावसायिक उपक्रमांचे सक्षमीकरण होऊ शकेल. सुलतानगंज ते खागरिया येथील अगवानी घाट येथे राज्य सरकारकडून बांधण्यात येत असलेल्या पुलाला हा रस्ता जोडला जाईल, त्यामुळे या रस्त्यावर जवळपास 6000 वाहनांची रहदारी आणखी वाढेल.
मुंगेल ते भागलपूर रस्ता, झारखंड येथील कहलगाव आणि मिर्झा चौकी हे बिहारमधील सर्वाधिक रहदारीचे मार्ग आहेत. बिहार, नेपाळ, पश्चिम बंगाल इत्यादी ठिकाणी दगड पुरवठा करण्याच्या दळणवळणात हा मार्ग जीवनवाहिनी ठरला आहे. हा एनटीपीसी कहलगाव पासून सहरसा, मधेपूरा, बेगसराय, पूर्णिमा आणि किशनगंज येथे जाण्यासाठी महत्त्वाचा मार्ग म्हणून वापरला जातो. एक महत्त्वाचा पर्यटन मार्ग असतानाच, भागलपूर येथील विक्रमशीला विद्यापीठाला देखील हा मार्ग जोडला जातो.
* * *
B.Gokhale/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1653084)
Visitor Counter : 113